नागपूर : काँग्रेसच्या चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार प्रतिभा धानोरकर यांनी विविध व्यापारी, कंत्राटदार कंपन्या आणि खासगी कंपन्यांकडून तब्बल ३९ कोटींहून अधिक रकमेचे तात्पुरते कर्ज (हातउसने) म्हणून घेतले आहे. त्यांनी उमेदवारी अर्जासोबत सादर केलेल्या संपत्तीच्या विवरणपत्रातून ही बाब उघड झाली आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज भरताना उमेदवारांना त्यांच्या संपत्तीचा तपशील सादर करावा लागतो. धानोरकर यांनी सादर केलेल्या संपत्ती विवरणानुसार, त्यांची एकूण संपत्ती ८० कोटी ३७ लाख २२ हजार ९५ रुपये आहे. त्यांत स्थावर मालमत्ता ३८ कोटी ६१ लाख ५२ हजार ४७९ रुपये आणि जंगम मालमत्ता ४१ कोटी ७५ लाख ६९ हजार ६१६ रुपये आहे. त्यांच्यावर ५५ कोटी २३ लाख ८६ हजार रुपयांचे कर्ज आहे. यामध्ये गृहकर्ज, व्यवसायासाठीचे कर्ज, वाहन खरेदीसाठी बँकांकडून घेतलेल्या १५ कोटी ४४ लाख ८५ हजार रुपयांच्या कर्जासह फक्त तात्पुरते कर्ज म्हणून घेतलेल्या ३९ कोटी रुपये कर्जाचा समावेश आहे.

In politics of district Mamu factor implemented in Akot constituency once again come into discussion
‘मामु’ फॅक्टर चालणार?, दलितांसह इतरांचे एकगठ्ठा मतदान…
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Priyanka Gandhi Kolhapur, Priyanka Gandhi criticizes Narendra Modi, Priyanka Gandhi,
सत्ता, पैशाचा गैरवापर करत मोदींकडून महाराष्ट्रात सरकार – प्रियांका गांधी
Minimum Support Price for Agricultural Produce
शेतमालाला हमीभाव नाहीच ; केंद्राच्या धडपडीनंतरही शेतकऱ्यांचे कोट्यवधीचे नुकसान
Marathwada vidarbh farmers
विश्लेषण: सोयाबीनच्या हमीभावावरून शेतकऱ्यांची नाराजी का? ७० हून अधिक मतदारसंघांमध्ये ठरणार निर्णायक मुद्दा?
maharashtra vidhan sabha elections 2024, Rajura,
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर थेट आंदोलन न करणाऱ्या ॲड. चटप यांना मतदार स्वीकारणार का?
maharashtra assembly election 2024 prakash ambedkar alleges that travel in mumbai and electricity bills is expensive because of adani
मुंबईतली प्रवास, वीज अदानींमुळे महाग, वंचित’च्या प्रकाश आंबेडकर यांचा आरोप

हेही वाचा >>>‘वापरा आणि फेका’ हीच भापजची नीती; महाविकास आघाडीच्या प्रचारसभेत आदित्य ठाकरे यांची टीका

दरम्यान, या संदर्भात प्रतिभा धानोरकर यांच्याशी संपर्क साधण्याचा वारंवार प्रयत्न केला, पण त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. त्यांच्या स्वीय साहायकाने ‘‘मॅडमला या विषयाची कल्पना दिली आहे’’ असे ‘लोकसत्ता’ला सांगितले.

धानोरकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना निवडणूक आयोगाला दिलेल्या संपत्ती विवरणपत्रातील तपशील चक्रावून टाकणारा आहे..   

कर्ज कोणाकडून?

धानोरकर यांनी हे कर्ज काही खासगी कंपन्या, काही कंत्राटदार कंपन्या, व्यापारी, गौण खनिज उत्खनन करणारे व्यावसायिक, दीर, सासरे आणि इतर नातेवाईकांकडून घेतले आहे. या कर्जाची रक्कम व्यक्तीनिहाय १० लाख ते सहा कोटी रुपयांच्या घरात आहे. एकाच व्यक्तीकडून त्यांनी सहा कोटी ४६ लाख १० हजार रुपये घेतले आहेत. त्याचप्रमाणे बांधकाम कंत्राटदार कंपनीकडून पाच कोटी ५० लाख २० हजार, मार्केटिंग कंपनीकडून तीन कोटी तीन लाख ४०६९ आणि ट्रेडिंग कंपनीकडून घेतलेल्या एक कोटी १० लाख रुपयांचाही त्यात समावेश आहे.