बुलढाणा : श्रावण मासानिमित्त श्री गजानन महाराज संस्थानकडून ३० दिवस ३० किर्तनकारांचे प्रबोधनपर प्रवचनाचे आयोजन करण्यात आले आहे. श्री भक्तांसाठी ही आध्यात्मिक पर्वणीच ठरणार आहे. १७ ऑगस्टपासून उत्सवास सुरुवात झाली असून १५ सप्टेंबर पर्यंत हा कीर्तन उत्सव चालणार आहे. दररोज रात्री ८ ते १० दरम्यान नामवंत कीर्तनकार प्रबोधन करीत आहे.
उद्या २४ ऑगस्टला भागवतबुवा जगताप, २५ ला दिनकरबुवा कडगावकर, २६ ला तुकारामबुवा सखारामपूरकर, २७ ला भरतबुवा म्हैसवाडिकर, २८ ला निलेशबुवा भुमरे, २९ ला चतुरभूजबुवा पाटील, २९ ला ज्ञानेश्वरबुवा गुरव, तर ३१ ऑगस्टला शिवाजीबुवा घाडगे यांचे कीर्तन पार पडणार आहे.
हेही वाचा : गोंदिया : वाघांच्या संरक्षणासाठी वनविभाग लागला कामाला; ‘लोकसत्ता’च्या वृत्ताची दखल
१ सप्टेंबर प्रकाशबुवा शास्त्री, २ विजयबुवा गव्हाणे, ३ ज्ञानेश्वरबुवा वराडे, ४ सप्टेंबरला पांडुरंगबुवा सरकटे, ५ सच्चीदानंदबुवा कुलकर्णी, ६ ला प्रमोदबुवा राहणे पळशी, ७ ला संजयबुवा लहाने, ८ ला जगन्नाथबुवा म्हस्के, ९ ला रामेश्वरबुवा तिजारे, १० ला अनिल बुवा पाटील, ११ ला विशालबुवा खोले, १२ ला भागवतबुवा शिंदे, १३ ला दत्तात्रयबुवा खिर्डीकर, १४ ला मंगेशबुवा वराडे तर १५ सप्टेंबरला सारंगधरबुवा पांडे यांचे कीर्तन होणार आहे.