नागपूर: विरोधकांनी कितीही आरोप केलेत तरीही उपयोग नाही. आमच्याकडेही माल मसाला तयार आहे. विरोधकांनी एक केस केली की आम्ही दोन केस करणार,हे ठरलेले आहे, असा दावा भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना केला.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
दरेकर पुढे म्हणाले, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या कार्यालयाची जागा कुठल्या जागेवर, हे आम्हाला माहिती आहे. आताच सगळे बोलणार नाही. लवकरच यासंदर्भात स्फोट होईल. सीमाप्रश्नावर बोलताना दरेकर म्हणाले,’सीमाप्रश्नावर संपूर्ण महाराष्ट्र सीमावासीयांच्या पाठीशी असल्याचा ठराव आम्ही मांडणार आहोत. राजकारण, पक्ष या पलीकडे जाऊन सीमावासीयांना आश्वस्त करणारा ठराव असेल.
First published on: 27-12-2022 at 10:34 IST
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Praveen darekar said in nagpur that the office of ambadas danve will be announced soon mnb 82 tmb 01