नागपूर: विधानसभा निवडणुकीच्या प्रचारा तोफा शांत झाल्यावर सोमवारी रात्री माजी गृहमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुखांवर हल्ला झाला. या हल्यामागे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचा हात असल्याचा आरोप अनिल देशमुख यांचे पुत्र सलील यांनी केला होता. आता या पक्षाचे प्रवक्ते प्रवीण कुंटे पाटील यांनी थेट भाजपच्या नेत्याचे नावच घेतले आहे.

अनिल देशमुख यांच्या नागपुरातील सिव्हिल लाईन्स येथील निवासस्थानी मंगळवारी (१९ नोव्हेंबर) झालेल्या पत्रकार परिषदेत प्रवीण कुंटे पाटील बोलत होते. याप्रसंगी पक्षाचे नेते किशोर गजभिये, नुतन रेवतकर आणि इतरही नेते उपस्थित होते. प्रवीण कुंटे पाटील  म्हणाले, काटोल मतदारसंघातून अनिल देशमुख यांचे पुत्र सलील देशमुख निवडणूक लढवत आहे. त्यांच्या विरोधात भाजपने  चरणसिंह ठाकूरांना उमेदवारी दिली. ठाकूर हे कंत्राटदार असून भाजपचे माजी मंत्री व आमदार परिणय फुकेंचे व्यवसायिक भागिदार आहे.

Bajrang Sonwane meets Amit Shah
“बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सीआयडी चौकशी व्हावी”; शरद पवारांचा खासदार थेट अमित शाहांना भेटला
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
nana patole
पैशाच्या जोरावर लोकशाही विकत घेण्याचा प्रयत्न म्हणजेच ‘ऑपरेशन लोटस’,पटोलेंचा घणाघात
Mahavikas Aghadi
Sanjay Shirsat : ‘मविआ’ला धक्का बसणार? “अनेकजण शिवसेना, भाजपाच्या संपर्कात”, शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा
Aba Bagul, Parvati Assembly Constituency,
‘बंडखोर’ आबांचे घरवापसीसाठी ‘आर्जव’
Sanjay Raut on Opration Lotus
Sanjay Raut : ‘मविआ’चे खासदार फुटणार असल्याची चर्चा; संजय राऊत म्हणाले, “भाजपा कोणतंही ऑपरेशन लोटस…”
account wise inquiry started against clerk in case of corruption in Jijamata Hospital of Municipal Corporation in Pimpri
पिंपरी : जिजामाता रुग्णालयातील रकमेचा अपहार; लिपिकाची खातेनिहाय चौकशी
sarva jat dharm ekta manch
बांगलादेशातील हिंदू विरुद्ध अत्याचार मोदी सरकारने रोखावेत, सर्व जाती-धर्म एकता मंचची मागणी

हेही वाचा >>>भाजप-काँग्रेस समर्थक भिडले, ग्रामस्थांकडून काँग्रेस उमेदवाराच्या समर्थकांना चोप

परिणय फुके हे भाजपमधील सर्वोच्च नेत्याच्या जवळचे आहे. त्यामुळे फुके यांनी आपले वजन वापरून ठाकूर यांना उमेदवारी मिळवून दिली. आता काटोलमध्ये राजकीय गुंडगिरीतून ठाकूर यांना जिंकवण्याचा प्रयत्न सुरू आहे. प्रत्यक्षात काटोलमध्ये मागील ३० ते ३५ वर्षांच्या काळात निवडणुकीत उभ्या असलेल्या कोणत्याही उमेदवारावर हल्याचा इतिहास नाही. परंतु फुके आणि ठाकूर यांनी यंदा भाजपचा उमेदवार निवडणूकीत हरत असल्याचे बघत अनिल देशमुखांवर जिवघेणा हल्ला करवून घेतला, असा आरोप कुंटे पाटील यांनी केला.

हेही वाचा >>>Anil Deshmukh Attack: भाजपला अनिल देशमुख यांच्यावरील हल्ल्यावर संशय का?

फुंकेंचा इतिहास वादाचा

मागच्या विधानसभा निवडणूकीत भाजपने साकोली मतदारसंघातून परिणय फुके यांना कॉंग्रेसचे नाना पटोले यांच्या विरोधात उमेदवारी दिली होती. तेथेही यापूर्वी कधीही निवडणुकीत राजकीय वादाचा इतिहास नव्हता. परंतु फुके यांनी तेथेही राजकीय गुंडागर्दीचे दर्शन घडवत राजकीय दंगा घडवला होता. अनिल देशमुखांच्या प्रकरणातही फुके आणि ठाकूर यांनी मिळवूनच अनिल देशमुखांवर  हल्ला घडवून आणला, असे  पाटील म्हणाले.

ठाकुरांना सुरक्षा, देशमुखांना नाही

माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर हल्यानंतर शासनाकडून भाजपचे उमेदवार चरणसिंह ठाकूरांच्या घरी तातडीने सुरक्षा वाढवली. मात्र देशमुखांच्या घरी अद्याप सुरक्षा वाढली नसल्याचाही आरोप प्रवीण कुंटे पाटीलांनी केला.

स्वत: देशमुखांनीच हल्ला करवला- फुके

अनिल देशमुखांवरील हल्ला म्हणजे ‘बनावट दगडफेक’ आहे. पोलिसांनी तातडीने एसआयटीमार्फत या प्रकरणाचा तपास सुरू करावा. त्यामुळे उद्याच्या मतदानावर परिणाम होणार नाही. तपासात सत्य कळले पाहिजे. सलील देशमुखांचा पराभव पाहून  देशमुख यांनी हे केले . अनिल देशमुख काहीतरी नाट्य करतील, असा इशारा यापूर्वीच अनेक सभांमध्ये जनतेला दिल्याचे, माजी मंत्री व भाजप नेते परिणय फुके यांनी प्रसिद्धीमाध्यमांशी बोलतांना सांगितले.

Story img Loader