नागपूर : हिंदूंत्वासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे ही सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची आणि माझी भूमिका आहे. काही मुद्द्यांवर आमचे मतभेद आहेत. संघासोबत राहून हिंदुत्वाच्या विषयावर हिंदूंसाठी काम करत राहणे ही एक प्रकारे हिंदू समाजाची होत असलेली सेवा असल्याचे मत आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे प्रमुख प्रवीण तोगडिया यांनी व्यक्त केले.

आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदचे प्रमुख प्रवीण तोगडिया यांनी रविवारी दुपारी महालातील संघ मुख्यालयात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये तासभर चर्चा झाल्यानंतर ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. विश्व हिंदू परिषदेधून बाहेर पडलो असलो तरी नव्याने संघटन निर्माण केल्यानंतर आज हिंदुत्वासाठी काम करतो आहे.

स्थानिक पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली. त्यांच्याशी तासभर चर्चा केली. प्रदीर्घ कालावधीनंतर संघ कार्यालयात जाण्याचा योग आला. सध्याच्या राजकारणावर कुठलीही चर्चा नाही मात्र सध्याची जगातील राजकीय स्थिती आणि त्यात हिंदूवर होत असलेला अन्याय या विषयांवर चर्चा झाली. संघ हिंदुत्वासाठी काम करत आहे आणि मी सुद्धा तेच करतो आहे. बांगलादेश मधील हिंदूंची परिस्थिती असो की इंग्लंड, कॅनडा आणि पाकिस्तान मधील हिंदू समाजावर होत असलेल्या अन्यायाच्या संदर्भात सरसंघचालकांशी चर्चा करण्यात आली आहे.

हे ही वाचा…देवेंद्र फडणवीस म्हणतात,‘बाबा सिद्दिकींची हत्या ही दुर्दैवी घटना; मुख्य सूत्रधार…’

आज सगळ्यात मोठे हिंदुत्वासाठी काम करणारे केंद्रीय संघटन हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे. आज आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद सुध्दा ५० हजार जागेवर उभे झालेले संघटन आहे. जो जो हिंदूत्वासाठी काम करेल त्यांची भेट घेणार आहे. ओवेसीला मी भेटू शकत नाही मात्र मोहन भागवत यांच्यासोबत भेटून चर्चा करु शकतो. आंतरराष्ट्रीय संघटन स्थापन केल्यानंतर गेल्या सहा- सात वर्षात केवळ हिंदू धर्मासाठी काम केले आहे. सरसंघचालकाना सहा वर्षांनी भेटलो, त्यामुळे त्यांच्याशी चांगली चर्चा झाली. हिंदूंत्व या विषयासाठी जर कोणाची भेट घेतली किंवा मला कोणी भेटायला आले तरी माझ्यासाठी गौरवाचीच बाब आहे.

हे ही वाचा…‘एमपीएससी’च्या रखडलेल्या पदांच्या नियुक्त्यांचा मार्ग मोकळा, आचारसंहितेपूर्वी…

हिंदूंसाठी जे जे काम करत आहे त्यांच्यासोबत राहणार आहे. त्यात माझ्या सोबत या अशी ऑफर कोणाला करण्याचा विषय नाही. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची शनिवारी भेट घेतली आणि रविवारी दुपारी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्याशी चर्चा केली. हिंदूच्या प्रश्नावर एक होऊन काम केले पाहिजे. नवरात्रामध्ये शस्त्रपूजन कन्याच्या सुरक्षेसाठी कन्या पूजन आदी कार्यक्रम देशभर घेण्यात आले आहे. विश्व हिंदू परिषदेमध्ये असताना हिंदू समाजासाठी जे काम करत होतो तेच काम आजही करत राहणार आहे.

Story img Loader