नागपूर : उच्चशिक्षण विभागाने एम.फिल. पात्रता पूर्ण केलेल्या पूर्णकालीन नियुक्त प्राध्यापकांना स्थाननिश्चिती व वेतनवाढप्रश्न निकाली काढला असून याबाबतचा शासन निर्णय उच्चशिक्षण विभागाने प्रसिद्ध केला. राज्यातील बिगर नेट, सेट प्राध्यापकांनी विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) निर्धारित केलेली अर्हता धारण केली त्या तारखेपासून अध्यापकांच्या सेवा नियमित करून करिअर अ‍ॅडव्हान्समेंट स्कीम (कॅस) अंतर्गत पदोन्नती लाभ देय करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यामुळे  हजारो प्राध्यापकांच्या वेतन,  पदोन्नतीचा तिढा सुटणार आहे.

विद्यापीठ अनुदान आयोगाने साहाय्यक प्राध्यापक भरतीसाठी नेट, सेट पात्रता सुरू केली आहे. मात्र २००६ पूर्वी अनेक महाविद्यालय आणि विद्यापीठांमध्ये एम.फिल. पात्रताधारक प्राध्यापक सेवेत आहेत. मात्र, यूजीसीच्या नवीन नियमांचा फटका २००६ पूर्वीपासून पूर्णवेळ सेवेत असणाऱ्या प्राध्यापकांना बसत असल्याने त्यांना ‘कॅस’अंतर्गत पदोन्नती दिली जात नव्हती. १४ जून २००६ पूर्वी ज्यांनी पीएच.डी. किंवा एम.फिल. अर्हता पूर्ण केली आहे अशा प्राध्यापकांना नेट, सेट या प्राध्यापक पात्रता परीक्षेतून सूट देण्यात यावी, असा प्रस्ताव विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मान्यतेसाठी विद्यापीठ शिक्षण मंचाने सादर केला होता. तो सादर करताना शिक्षण मंचाने बिगर नेट, सेट प्राध्यापकांची यादी प्रत्येक विद्यापीठाला पाठवलेली होती. यावर विद्यापीठ अनुदान आयोगाने सकारात्मक पाऊल उचलत ५ नोव्हेंबर २०२२ रोजीच्या पत्रान्वये १४ जून २००६ पूर्वी निवड समितीच्या माध्यमातून नियुक्ती तसेच सेवेत सदर अर्हताधारकांना दिलासा दिला. ज्यांना विद्यापीठाने नियमित मान्यता दिली व ज्यांना विद्यापीठ अनुदान आयोगाने ‘नेट’मधून सूट दिलेली आहे, असे प्राध्यापक एम.फिल. अर्हता धारण केल्याच्या या दिनांकापासून ‘कॅस’अंतर्गत पदोन्नतीसाठी पात्र ठरणार आहेत. त्यामुळे  अशा सर्व अध्यापकांचा ‘कॅस’अंतर्गत पदोन्नतीचा मार्ग मोकळा झालेला आहे. 

CET registration, students, Ticket facility, CET ,
सीईटी नोंदणीदरम्यान विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी ‘तिकीट सुविधा’
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Higher education , skill courses, guidelines UGC,
उच्च शिक्षणात आता कौशल्य अभ्यासक्रमांवर भर; ‘यूजीसी’कडून मार्गदर्शक सूचनांचा मसुदा प्रसिद्ध
Higher Education Policy State University Chancellor Elections
उच्च शैक्षणिक धोरणदशा!
Reaction from the education sector on UGC NEP implementation proposal pune news
आधी निधी द्या, मग स्वतंत्रपणे मूल्यमापन करा; यूजीसीच्या ‘एनईपी’ अंमलबजावणी प्रस्तावावर शिक्षण क्षेत्रातून प्रतिक्रिया
assistant professor without NET-SET
सहायक प्राध्यापक होणे नेट-सेटशिवायही शक्य?
savitribai phule pune university warns affiliated colleges for not providing naac information
‘नॅक’ची माहिती न दिल्यास प्रवेशांवर निर्बंध; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा संलग्न महाविद्यालयांना इशारा
Why is the establishment of the Higher Education Commission delayed print exp
उच्च शिक्षण आयोगाचे काय झाले? स्थापनेस विलंब का?

यूजीसीने २००६ पूर्वीपासून सेवेत असलेल्या एम.फिल. पात्रताधारक प्राध्यापकांना ‘कॅस’अंतर्गत पदोन्नती द्यावी, अशी मागणी अनेक दिवसांपासून करत होतो. शासनाने या निर्णयाला मान्यता दिल्यामुळे राज्यातील शेकडो शिक्षकांच्या पदोन्नतीचा प्रश्न मार्गी लागला आहे.

– डॉ. कल्पना पांडे, अध्यक्षा, विद्यापीठ शिक्षण मंच

Story img Loader