गोंदिया : अर्जुनी मोरगाव तालुक्यातील कोरंभीटोला येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसुतीकरीता दाखल झालेल्या गर्भवती महिलेला योग्य उपचार न मिळाल्याने तिचा मृत्यू झाल्याची घटना ४ डिसेबरला घडली.दरम्यान गर्भवती महिलेच्या मृत्यूला दोषी वैद्यकीय अधिकारी व कर्मचारीवर्गावर कारवाई करण्याची मागणी मृतकाच्या नातेवाईंकासह नागरिकानी करीत आरोग्य केंद्रासमोर आंदोलन केल्याने पोलिसांना पाचारण करण्यात आले होते.

मृत महिलेचे नाव वसंता धनराज नैताम(वय ३३)मु.कोरंभीटोला असे आहे. सविस्तर असे की,गर्भवती महिला वंंसता नैताम हिला कोरंभीटोला येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसुतीकरीता दाखल करण्यात आले होते.३ डिसेंबरला सकाळी ६ वाजेपासून तर सायकांळ ४ वाजेपर्यंत गर्भवती महिलेकडे वैद्यकिय अधिकारी व आरोग्य कर्मचार्याने लक्ष न दिले नाही. सायकांळी ३ वाजेच्या सुमारास सदर महिलेचे पती धनराज नैताम यांनी पत्नीला कळा येत असून त्रास होत असल्याने लक्ष देण्याची विनंती केली. त्यानंतर परिचारिका सोनाली राऊत हिने अन्य एका परिचारिकेला सोबत घेत पाहणी केली असता गर्भवती महिलेच्या पोटातच बाळाने शौच केल्याचा अंदाज लावत व परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच अर्जुनी मोरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यास सांगितले.

What Nitesh Rane Said?
Ladki Bahin Yojana : “दोनपेक्षा जास्त मुलं असणाऱ्या मुस्लिम कुटुंबांना लाडकी बहीण योजनेतून वगळा”, आमदार नितेश राणेंची मागणी
Rohit Patil
Rohit Patil : “अमृताहुनी गोड…”; विधानसभेत रोहित पाटलांचं…
young woman abandoned her newborn near Vanzra Layout Nagpur
अनैतिक संबंधातून जन्मलेल्या बाळाला रस्त्यावर फेकले
Pregnant woman died in tiger attack, Gadchiroli,
गडचिरोली : वाघाच्या हल्ल्यात गर्भवती महिला ठार
police ended controversy between mother and daughter both were reunited
पतीच्या निधनानंतर मुलीसाठी लग्न केले नाही, कष्ट उपसले, पण तरुण होताच मुलीने…
Man stabs wife for not paying for alcohol
पुणे : दारुसाठी पैसे न दिल्याने पत्नीवर चाकूने वार
Attempt to kill wife by pouring fennel to her in kalyan
डोंबिवलीत पत्नीला फिनेल पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न
Pregnant Women Delivery, Hinjewadi Women Traffic Police, Women Traffic Police Help, Pregnant Women Delivery news pune,
पुणे : महिला पोलिसांमुळे महिलेची सुखरूप प्रसूती; अचानक पोट दुखायला लागलं अन… नेमकं काय घडलं?

हेही वाचा…भंडारा : वाघ पाहण्याची उत्सुकता; तुफान गर्दी अन् पोलिसांवरच …

त्यानंतर रुग्णवाहिकेने सुमारे पाच वाजेच्या सुमारास ग्रामीण रुग्णालय अर्जुनी मोरगाव येथे दाखल करण्यात आले असता,तिथूनही सायकांळी सात वाजेच्या सुमारास गोंदिया येथील बाई गंगाबाई महिला रुग्णालयाकरीता रेफर करण्यात आले. सायकांळी ७:३० वाजता गोंदियाकरीता सदर गर्भवती महिलेला रुग्णवाहिकेने नेत असतनाच गोरेगाव जवळ सदर महिलेचा मृत्यू झाला. या घटनेमुळे गर्भवती महिलेचे पती व नातेवाईंकानी कोरंभीटोला येथील वैद्यकीय अधिकारी डाॅ.दिनेश बारसागडे यानी दुर्लक्ष केल्यामुळेच मृत्यू झाल्याचा आरोप करीत डाॅ.बारसागडेवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची व इतर कर्मचाऱ्यांना निलबंन करण्याची मागणी करीत प्राथमिक आरोग्य केंद्र कोंरभीटोला येथे आंदोलनास सुरवात केली.

हेही वाचा…साहित्य संमेलनाच्या मंचावर मोदी-पवार एकत्र ? ७० वर्षांपूर्वीच्या प्रसंगाच्या पुनरावृत्तीचा आयोजकांचा प्रयत्न

आरोग्य केंद्रातून मृतदेह हलविण्यास नकार दिल्याने अर्जुनी मोरगाव पोलिसांना पाचारण करण्यात आले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत अर्जुनी मोरगाव पंचायत समितीच्या सभापती सविता कोडापे,जिल्हा परिषद सदस्य जयश्री देशमुख,पंचायत समिती सदस्य नाजुक कुंभरे,भाग्यश्री सयान यांनी घटनास्थळी दाखल होत जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ.नितिन वानखेडे यांच्यांशी संपर्क करीत चर्चा केली. त्यानंंतर डाॅ.वानखेडे यांनी कोरंभीटोला येथील वैद्यकीय अधिकारी दिनेश बारसागडे यांना लगेच तिरोडा तालुक्यातील वडेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात सेवासंलग्न करण्याचे आदेश दिले. त्यानंतर सदर महिलेचा मृतदेह आरोग्य केंद्रातून हलवून सायकांळच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले.

Story img Loader