नागपूर : भारताच्या राज्यघटनेने सर्वांना समानतेचा हक्क दिला आहे. समानतेच्या न्यायाने सर्वांना मंदिरात प्रवेश करण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र, आपल्या देशात अजूनही काही मंदिरात महिलांना प्रवेश दिला जात नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काही वर्षांपूर्वी शबरीमला मंदिरात महिलांना प्रवेश मिळावा, यासाठी मोठी न्यायालयीन लढाई लढली गेली होती. आता स्त्रीयांना मंदिरात बंदीचा नवीन प्रकार समोर आला आहे. जाणून घ्या नेमके काय हे प्रकरण आहे.

हेही वाचा – हवामान खात्याचा दिलासा! मुंबईत बरसणार पण..

चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथे प्राचीन श्री भद्रनाग मंदिर आहे. या मंदिरात, मंदिराच्या आवारात सर्वांना प्रवेश आहे. मात्र, गर्भवती महिलांना मंदिरात प्रवेशास मनाई करण्यात येत आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारावर गर्भवती महिलांसाठी फलक लावण्यात आले आहे. त्यामध्ये गर्भवती महिलांनी आत प्रवेश करू नये, असा मजकूर लिहिला आहे.