जिल्ह्यातील बारा कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकांसाठी राजकीय मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. दोन वर्षांपासून रखडलेल्या या निवडणुकांमध्ये राज्यातील सत्तांतराचा प्रभाव राहणार असल्याचे सांगितले जात आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका करोनामुळे रखडल्या होत्या. परंतु आता जिल्ह्यातील १२ कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. अमरावती-भातकुली, चांदूरबाजार, अंजनगाव सुर्जी, वरूड, धामणगाव रेल्वे, मोर्शी, अचलपूर, नांदगाव खंडेश्वर, धारणी, तिवसा, दर्यापूर व चांदूर रेल्वे या १२ कृषी उत्पन्न बाजार समित्यांची मुदत २ वर्षांपुर्वीच संपली होती. या बाजार समित्यांना मुदतवाढ देण्यात आली असून या बाजार समित्यांवर प्रशासकाची नेमणूक आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सेवा सहकारी, ग्रामपंचायत, अडते व्यापारी, मापारी अशा चार मतदार संघांमध्ये जुन्याच पद्धतीने ही निवडणूक पार पडणार आहे. सध्या मतदार यादी तयार करण्याची प्रक्रिया सुरू असून २९ जानेवारी २०२३ रोजी निवडणुकीचा संभाव्य कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे, मात्र या निवडणुकीच्या तारखेत बदल होण्याची शक्यता सहकार क्षेत्रातील सूत्रांनी व्यक्त केली आहे. बाजार समितीच्या निवडणुकीत सर्व शेतकऱ्यांना मताधिकार देण्याचा निर्णय विद्यमान सरकारने घेतला आहे, मात्र यासंदर्भातील अध्यादेश अद्याप जारी झालेला नाही. त्यामुळे प्रचलित पद्धतीनेच सेवा सहकारी सोसायटी मतदारसंघातून ११. ग्रामपंचायत ४, व्यापारी २ आणि हमाल-अडते मतदारसंघात १ असे एकूण १८ संचालक निवडले जाणार आहेत. अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीची याआधीची निवडणूक २०१५ मध्ये झाली होती. त्यावेळी एकूण ७३ उमेदवार रिंगणात होते. बाजार समितीच्या त्यावेळच्या निवडणुकीत तीन पॅनेल आणि अपक्ष उमेदवार रिंगणात होते.

हेही वाचा :वाशीम: कार आणि ट्रकच्या भीषण धडकेत मायलेकाचा मृत्यू

ग्रामपंचायत निवडणुकांच्या हालचाली

जिल्ह्यातील २५६ ग्रामपंचायतींमध्ये देखील निवडणुकांच्या हालचाली सुरू झाल्या असून लवकरच निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यात येतील, अशी माहिती सूत्रांनी दिली. डिसेंबरमध्ये या निवडणुका होण्याची शक्यता आहे, त्यामुळे ग्रामीण भागात मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने मतदार यादीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने गेल्या ४ ऑक्टोबरला जाहीर केला होता. या सर्व ग्रामपंचायतींमध्ये अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाली आहे. दोन दिवसांपूर्वीच निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील दोन ग्रामपंचायतींच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. ग्रामपंचायतींच्या या निवडणुकीत यावेळी जनतेमधून थेट सरपंच निवडला जाणार असल्याने उत्सुकता वाढली आहे. इच्छुकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. दिवाळी सणादरम्यान इच्छुकांनी जनसंपर्क वाढवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.