मराठा सेवा संघाच्या मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात येणाऱ्या जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्याची जय्यत तयारी आता अंतिम टप्प्यात आहे. यानिमित्त जिजाऊ सृष्टी व राजमाताचे जन्मस्थान असलेला राजवाडा नटला असून मुख्य सोहळा १२ जानेवारीला पार पडणार असून खासदार उदयनराजे भोसले यांची प्रमुख उपस्थिती, मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष ॲड. पुरुषोत्तम खेडेकर यांचे मुख्य मार्गदर्शन आणि विविध पक्षीय नेत्यांची मांदियाळी यंदाच्या सोहळ्याचे आकर्षण ठरणार आहे.

हेही वाचा >>>‘लोकसत्ता’च्या वृत्तमालिकेने वनविभागाला जाग, कोट्यवधींची वनजमीन घेतली ताब्यात; भूमाफियांचे धाबे दणाणले!

maharashtra assembly election 2024 issue of bullying is effective in campaigning in three constituencies of Marathwada
मराठावाड्यातील तीन मतदारसंघांत गुंडगिरीचा मुद्दा प्रचारात प्रभावी
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
ageing population increasing in india
वृध्दांच्या लोकसंख्येचा दर वाढता, काय आहेत आव्हानं?
Marathi Rangbhoomi Divas , Marathi Theatre Day, 5th November
विश्लेषण : रंगभूमी दिन ५ नोव्हेंबरला का असतो? यंदा अद्याप साजरा का झाला नाही?
पुन्हा ‘३७० कलम’ राहुल गांधींना आता कायमचे अशक्य- अमित शहा यांचे काँग्रेसवर टीकास्र
inconvenient to carry dead bodies due to no road at Alibagh Khawsa Wadi
रस्ता नसल्याने मृतदेह झोळी करून वाडीवर नेण्याची वेळ…
Loksatta chaturanga Parent Nature Confused Psychologist
सांधा बदलताना : संसार शांतीचा झरा…
maharashtra assembly election 2024 amol kolhe allegations bjp for online cash payment to voters
भोसरीत भाजपकडून ‘ऑनलाइन लक्ष्मी दर्शन’?, कोणी केला हा गंभीर आरोप

दरवर्षी मातृतीर्थ सिंदखेडराजात देश-विदेशातील लाखो जिजाऊ भक्तांच्या साक्षीने सोहळा साजरा करण्यात येतो. या सोहळ्याची वातावरण निर्मिती सावित्री-जिजाऊ दशरात्रोत्सवाने झाली आहे. या अंतर्गत ४ ते १० जानेवारी दरम्यान सिंदखेडराजा परिसरातील शालेय व महाविद्यालयीन विद्यर्थ्यांनी विविध रंगी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. यानंतर महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे १० व ११ जानेवारी दरम्यान जिजाऊ गाथा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. जिजाऊ सृष्टी वर आयोजित या महोत्सवात उद्या बुधवारी सकाळी ९ ते संध्याकाळी ४ दरम्यान कीर्तन महोत्सव पार पडणार आहे. संध्याकाळी साडेपाच वाजता राजवाड्यावर दीपोत्सव तर त्यानंतर राजवाडा ते जिजाऊ सृष्टी दरम्यान मशाल यात्रा काढण्यात येईल. रात्री साडेआठला महिलांचे सांस्कृतिक कार्यक्रम पार पडणार आहे.

हेही वाचा >>>नागपूर: ‘एम्स’ला गुडघा प्रत्यारोपण करायचेय.. सहा महिने थांबा; प्रतीक्षा यादीमुळे रुग्णांचा जीव टांगणीला

१२ तारखेला सकाळी ६ वाजता लखुजीराजे जाधव यांच्या राजवाड्यात महापूजा, ७ वाजता पालखीसह वारकरी दिंडी, ९ वाजता शिवधर्म ध्वजारोहण आणि दुपारी दीड वाजेपर्यंत शाहिरांचे पोवाडे, सत्कार सोहळे, प्रकाशन सोहळे, सामूहिक विवाह सोहळा पार पडणार आहे. प्रदेश कार्यध्यक्ष अर्जुन तनपुरे यांच्या अध्यक्षतेखाली सर्व कक्षांचे प्रदेशाध्यक्ष व जिल्हाध्यक्ष हजर राहणार आहे. दुपारी २ ते ६ वाजता शिवधर्म पीठ येथे आयोजित मुख्य सोहळ्यात उदयन राजे भोसले व मराठा सेवा संघाचे सर्वेसर्वा पुरुषोत्तम खेडेकर यांचे मार्गदर्शन करणार आहे. सडेतोड मत प्रदर्शनासाठी ओळखले जाणारे ॲड. खेडेकर यावेळी काय व कसे प्रबोधन करतात याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. यावेळी विविध पक्षीय नेत्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. यामध्ये गुलाबराव पाटील, अंबादास दानवे, नानाभाऊ पटोले, सुप्रिया सुळे, अरविंद सावंत, प्रतापराव जाधव, रक्षा खडसे, ज्ञानेश्वर पाटील, राजेंद्र शिंगणे, सुभाष देसाई, संजय कुटे, संजय रायमूलकर, श्वेता महाले, संजय गायकवाड, आकाश फुंडकर, राजेश एकडे, वसंत खंडेलवाल, किरण सरनाईक यांचा समावेश आहे. याशिवाय नगराध्यक्ष सतीश तायडे, मराठा सेवा संघाचे कामाजी पवार, प्रदेशाध्यक्ष विजय घोगरे, महासचिव मधुकर मेहेकरे, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे, जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्ष माधुरी भदाणे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

पुरस्कार जाहीर

संघटनेतर्फे दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. कांतराव देशमुख यांना मराठा कृषी उद्योजक, स्नेहा कोकणे यांना मराठा क्रीडा भूषण तर ज्ञानेश्वर घोडके यांना मराठा कृषी भूषण पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

हेलिकॉप्टरद्वारे जिजाऊ जन्मस्थळावर पुष्पवृष्टी

हेही वाचा >>>नागपूर: विदर्भात मुलींसाठी हक्काचे अनुरक्षण गृह नाही; बालगृहात १८ वर्षे पूर्ण झालेल्या मुलींची अडचण

राष्ट्रमाता जिजाऊंच्या जन्मोत्सवानिमित्त त्यांचे जन्मस्थळ असलेल्या लखुजीराजे जाधव राजवाड्यावर १२ जानेवारीला हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. अभिता लॅन्ड सोल्यूशन कंपनीने यासाठी पुढाकार घेतला आहे. यासाठी सुनील शेळके मुंबई येथून हेलिकॉप्टरने येणार आहेत. पुष्पवृष्टी करतेवेळी त्यांची कन्या अभिता शेळके सोबत असणार आहे. याचा ‘टीझर’ समाजमाध्यमांवर वेगाने प्रसारित होत आहे. दिशा बुलडाणा जिल्हा महिला बचतगट फेडरेशनच्या संस्थापक अध्यक्षा जयश्री शेळके यांनी रोजगार मेळावाही आयोजित केला आहे.