नागपूर : मान्सूनचा भारतातील प्रवेश अवघ्या काही दिवसांवर आला असताना भारतीय हवामान खात्याने महाराष्ट्रासह देशाच्या अनेक भागांत मान्सूनपूर्व पावसाची शक्यता वर्तवली आहे. राज्यातील मुंबई, ठाणे, पालघर वगळता राज्यातील सर्वच जिल्ह्यांत मान्सूनपूर्व पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

वादळीवारा आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. अनेक दिवसांच्या स्थिरतेनंतर नैऋत्य मान्सून यावेळी बंगालच्या उपसागरात पोहोचला आहे. मान्सून आता वेगाने पुढे सरकत असून हवामानात सातत्याने बदल होत आहेत. महाराष्ट्रातही कधी पाऊस पडतो तर कधी कडक ऊन पाहायला मिळत आहे. महाराष्ट्राच्या काही भागांत उष्णतेच्या लाटेची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.

Garlic Rate, Vegetable Rate, Pune, Garlic,
लसूण महागला, परराज्यातील लसणाची आवक कमी
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
minor boy stabbed his mother
कोवळ्या वयात एवढा राग…मुंबईत अल्पवयीन मुलाकडून आईवर चाकूने हल्ला, महिलेवर शीव रुग्णालयात उपचार सुरू
ageing population increasing in india
वृध्दांच्या लोकसंख्येचा दर वाढता, काय आहेत आव्हानं?
Sanjay raut Maharashtra unsafe
Sanjay Raut: “मोदी जेव्हा येतात, तेव्हा महाराष्ट्र असुरक्षित”, संजय राऊत यांची टीका
thane district home voting
ठाणे जिल्ह्यात ९३३ नागरिक करणार गृह मतदान, आज पासून मतदानास सुरुवात
maharashtra pollution control board to submit report to ngt on noise pollution
सर्वच गणेश मंडळांकडून ध्वनिप्रदूषण! महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ देणार ‘एनजीटी’ला अहवाल
Child Marriage, Supreme Court, Child Marriage Prevention Act,
बालविवाहाचा फेरा : भारत मुक्त कधी होईल?

हेही वाचा – भंडाऱ्यातले एक माकड लय भारी, त्याची हॉटेलिंगची तऱ्हाच न्यारी; दर मंगळवार आणि शनिवारी बुक असतो टेबल, जिलेबी आणि समोसासह…

राज्यासह देशात काही ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबई आणि लगतच्या किनारी भागातील लोकांना कडक उन्हाचा सामना करावा लागणार आहे. तर येत्या २४ तासांत मराठवाडा आणि विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने रायगड, पुणे, नाशिक, कोल्हापूर, सातारा, सांगली, अमरावती, अहमदनगर, सिंधुदुर्ग, सोलापूर, परभणी, बीड, जालना, हिंगोली, नांदेड, अकोला, लातूर, उस्मानाबाद, अमरावती, गडचिरोली, गोंदिया, वर्धा, वाशीम येथे पावसाची शक्यता वतवली आहे.

हेही वाचा – विकृतीचा कळस! भिलाईतील नराधमाचा गायीवर लैंगिक अत्याचार; गोंदिया आरपीएफने आवळल्या मुसक्या

यवतमाळ, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, धुळे, नंदुरबार, जळगाव, कोल्हापूर, औरंगाबादच्या अनेक भागांत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर बीड आणि जालना वगळता इतर जिल्ह्यांसाठीही ‘येलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.