वर्धा : भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आपला विदर्भ दौरा करण्याचे पक्के केले आहे. त्या दृष्टीने प्रशासन कामाला लागले आहे. राष्ट्रपती मुर्मू यांना गतवर्षी निमंत्रण मिळाले होते. येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाने हे निमंत्रण दिले होते. त्याचा स्वीकार केल्याचे पत्र अखेर पोहोचले.
आज एक वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात त्या अनुषंगाने बैठक झाली. त्यात राष्ट्रपतींच्या संभाव्य आगमनाबाबत चर्चा झाल्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सांगितले. हिंदी विद्यापीठात दीक्षांत सोहळ्यास उपस्थिती व भव्य सभागृहाचे लोकार्पण असे कार्यक्रम होतील. व त्यानंतर सेवाग्राम आश्रम भेट असे तीन कार्यक्रम सहा जुलैला होणार आहे.
हेही वाचा – नागपूर : गर्भवती महिलांना ‘या’ मंदिरात अद्यापही प्रवेश नाही
राष्ट्रपतींचे आगमन गडचिरोली येथील समारंभ आटोपून हेलिकॉप्टरने वर्धेत होणार. तर वर्धेतील कार्यक्रम आटोपल्यानंतर त्या नागपूरला जाणार आहेत. अद्याप राष्ट्रपती भवनातून मिनिट टू मिनिट कार्यक्रम आलेला नाही.