नागपूर: भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू एक डिसेंबरला नागपूर दौ-यावर येणार आहेत. पाच महिन्यातील हा त्यांचा दुसरा नागपूर दौरा आहे. यापूर्वी त्यांनी जुलै महिन्यात जिल्ह्यातील कोराडी मंदिराला भेट दिली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अमृत महोत्सवानिमित्त १ डिसेंबरला आयोजित कार्यक्रमाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू नागपूर येथे येणार आहेत. त्यांच्या दौऱ्यासाठी प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी वैद्यकीय महाविद्यालयात बैठक घेतली. यावेळी अधिष्ठाता राज गजभिये उपस्थितीत होते.

हेही वाचा… अन्न पदार्थात भेसळ, विशेष मोहिमेत ‘या’ बाबींची तपासणी

मध्य भारतातील सर्वात मोठे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय अशी नागपूरच्या रुग्णालयाची ओळख आहे. या रुग्णालयात शेजारच्या मध्यप्रदेश आणि छत्तीसगढ येथून रूग्ण उपचारासाठी येतात. रूग्णालयाच्या अद्ययावतीकरणाचे काम शासनाने हाती घेतले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी कार्यक्रमस्थळाची प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच रूग्णाल परिसरात सुरु असलेली दुरुस्तीची कामे, अतिक्रमण तसेच कार्यक्रमासाठी आवश्यक सुविधा निर्माण करणे, शासनाकडे प्रस्ताव सादर करणे आदीं संदर्भात सूचना केल्या.