केंद्रीय गृहमंत्रालयाकडून राष्ट्रपती पोलीस पदकांची घोषणा करण्यात आली. यात महाराष्ट्रातील एकूण ७४ पोलिसांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. यात नागपूर ग्रामीण पोलीस दलाचे स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे यांचा समावेश आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – नागपूर: भाजप नेता पुत्राच्या विवाह मंडपासाठी सार्वजनिक रस्ता बंद, महापालिकेने केली कारवाई

हेही वाचा – भंडारा : धक्कादायक ! अल्पवयीन मुलाचा ६ वर्षीय मुलीवर अत्याचार

राज्य पोलीस दलातील चार पोलीस अधिकाऱ्यांना ‘राष्ट्रपती पोलीस पदक’, ३१ पोलिसांना ‘पोलीस शौर्यपदक’ तर ३९ पोलिसांना ‘पोलीस पदक’ जाहीर झाले. नागपूरमधील एकमेव पोलीस अधिकारी ओमप्रकाश कोकाटे यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहिर झाले. तसेच, गडचिरोतील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही गुणवत्तापूर्वक सेवेसाठी पदके जाहीर झाली आहे. तत्कालीन अपर पोलीस अधीक्षक मनिष कलवानीया यांनासुद्धा दुसऱ्यांदा राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाले आहे.