नागपूर : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला महिलांचा मिळणारा वाढता प्रतिसाद लक्षात घेता आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महायुतीमध्ये उत्साह असला तरी मतांसाठीच बहीण लाडकी का? तिला विधानसभेची उमेदवारीही देऊन आमदारही करा, यासाठी महिला कार्यकर्त्यांकडून महायुतीच्या घटक पक्षावर दबाव वाढू लागला आहे.

लोकसभा निवडणुकीत सर्वस्तरावर प्रयत्न करूनही पराभव झाल्याने राज्यातील एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मध्यप्रदेशात ‘गेमचेंजर’ ठरलेल्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेची घोषणा केली.

cm eknath shinde
…विकास हाच आमचा अजेंडा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्पष्ट प्रतिपादन
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Actor Govinda chest pain
अभिनेता गोविंदा छातीत दुखू लागल्याने रोड शो अर्धवट सोडून मुंबईत परत
Raju Patil Sandeep Mali
राजकिय वातावरण गढूळ करणाऱ्या शिंदे पिता-पुत्राचे राजकारण संपविण्याची वेळ आली आहे; मनसे आमदार राजू पाटील यांची संतप्त प्रतिक्रिया
sunetra pawar dhairyasheel mane on central textile committee
केंद्रीय वस्त्रोद्योग समितीवर धैर्यशील माने, सुनेत्रा पवार
Eknath Shinde, Eknath Shinde comment on Mahavikas Aghadi, Mehkar,
मुख्यमंत्री शिंदे म्हणतात, “धनुष्य चोरायला ते काही खेळणं आहे का? लाडक्या बहिणींना एकविसशे रुपये…”
eknath shinde comment ladki bahin yojana daryapur vidhan sabha
मुख्‍यमंत्री म्हणतात, मी शंभरवेळा तुरूंगात जाण्‍यास तयार…कारण…

हेही वाचा…नागपूर : धरमपेठ ‘रस्त्या’वरील वादग्रस्त पबचा परवाना रद्द करा, त्रस्त नागरिकांची उपमुख्यमंत्र्यांकडे धाव

बँकेच्या खात्यात दीड हजार रुपये जमा होणार असल्याने महिलांनी या योजनेला उदंड प्रतिसाद दिला. तो सत्ताधाऱ्यांना दिलासा देणारा ठरला आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जळगावमध्ये ‘लखपती दीदी’चा सत्कार करून त्यांचा उत्साह वाढवला. आता या योजनांचे परिणाम राजकीय पातळीवरही दिसून येत आहेत.

‘लाडक्या बहिणीं’चा आठव फक्त मतांपुरताच नको तर विधानसभा निवडणुकीत उमेदवारी देण्यासाठीही करावा, असा आग्रह महिला नेत्या त्यांच्या पक्षश्रेष्ठींकडे करू लागल्या आहेत. नागपूरमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन काही महिला नेत्यांनी याबाबत सूतोवाचही केले आहे. काँग्रेसवरही महिलांना उमेदवारी देण्यासाठी दबाव असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

नागपूर जिल्ह्याची स्थिती

नागपूर जिल्ह्यात विधानसभेच्या एकूण १२ जागा आहेत. पण यात एकही महिला आमदार नाही. महिलांना फक्त त्यांच्यासाठी राखीव असलेल्या जागांवरच संधी दिली जाते. त्यापलीकडे महिलांचा विचार व्हावा, असा मतप्रवाह सर्वपक्षीय महिला नेत्यांमध्ये आहे. नागपूर शहर आणि ग्रामीणमध्ये प्रत्येकी एका महिलेला उमेदवारी देण्याचा विचार काँग्रेसमध्ये सुरू असल्याची माहिती आहे. भाजपही याबाबत सकारात्मक विचार करीत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

हेही वाचा…शहरातील ५० ते ६० वर्षांपूर्वीचे पुतळे आजही…..

३१ ला महिला मेळावामुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेंतर्गत ३१ ऑगस्टला रेशीमबाग मैदानावर महिलांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम सरकारी असला तरी यापूर्वी राज्यात इतर ठिकाणी झालेल्या अशाच प्रकारच्या कार्यक्रमातील राजकीय भाषणे लक्षात घेता त्याला संपूर्ण राजकीय स्वरूप येणार हे स्पष्ट आहे. मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री या कार्यक्रमाला येणार असून ५० हजार महिलांच्या उपस्थितीचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे.

सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी उमेदवारी देताना समान संधी धोरणानुसार महिलांचा विचार करावा तरच खऱ्या अर्थाने महिला सबलीकरणाचा उद्देश यशस्वी होईल. – कुंदा राऊत, काँग्रेस नेत्या व जि.प. उपाध्यक्ष.

हेही वाचा…मोठी बातमी! मोहन भागवत यांना मोदी, शहांच्या दर्जाची सुरक्षा; केंद्रीय गृहमंत्रालयाचा निर्णय

लाडकी बहीण योजना महिलांचा सन्मान करण्यासाठीच महायुती सरकारने जाहीर केली आहे. महिलांना संधी देण्याची भाजपची नेहमीच भूमिका राहिली आहे. या विधानसभा निवडणुकीत पक्षाने महिलांना अधिकाधिक संधी द्यावी, असा आग्रह आम्ही पक्षाकडे धरणार आहोत.– अर्चना डेहनकर, प्रवक्त्या, भाजप.