नागपूर : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला महिलांचा मिळणारा वाढता प्रतिसाद लक्षात घेता आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महायुतीमध्ये उत्साह असला तरी मतांसाठीच बहीण लाडकी का? तिला विधानसभेची उमेदवारीही देऊन आमदारही करा, यासाठी महिला कार्यकर्त्यांकडून महायुतीच्या घटक पक्षावर दबाव वाढू लागला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
लोकसभा निवडणुकीत सर्वस्तरावर प्रयत्न करूनही पराभव झाल्याने राज्यातील एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मध्यप्रदेशात ‘गेमचेंजर’ ठरलेल्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेची घोषणा केली.
बँकेच्या खात्यात दीड हजार रुपये जमा होणार असल्याने महिलांनी या योजनेला उदंड प्रतिसाद दिला. तो सत्ताधाऱ्यांना दिलासा देणारा ठरला आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जळगावमध्ये ‘लखपती दीदी’चा सत्कार करून त्यांचा उत्साह वाढवला. आता या योजनांचे परिणाम राजकीय पातळीवरही दिसून येत आहेत.
‘लाडक्या बहिणीं’चा आठव फक्त मतांपुरताच नको तर विधानसभा निवडणुकीत उमेदवारी देण्यासाठीही करावा, असा आग्रह महिला नेत्या त्यांच्या पक्षश्रेष्ठींकडे करू लागल्या आहेत. नागपूरमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन काही महिला नेत्यांनी याबाबत सूतोवाचही केले आहे. काँग्रेसवरही महिलांना उमेदवारी देण्यासाठी दबाव असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
नागपूर जिल्ह्याची स्थिती
नागपूर जिल्ह्यात विधानसभेच्या एकूण १२ जागा आहेत. पण यात एकही महिला आमदार नाही. महिलांना फक्त त्यांच्यासाठी राखीव असलेल्या जागांवरच संधी दिली जाते. त्यापलीकडे महिलांचा विचार व्हावा, असा मतप्रवाह सर्वपक्षीय महिला नेत्यांमध्ये आहे. नागपूर शहर आणि ग्रामीणमध्ये प्रत्येकी एका महिलेला उमेदवारी देण्याचा विचार काँग्रेसमध्ये सुरू असल्याची माहिती आहे. भाजपही याबाबत सकारात्मक विचार करीत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
हेही वाचा…शहरातील ५० ते ६० वर्षांपूर्वीचे पुतळे आजही…..
३१ ला महिला मेळावामुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेंतर्गत ३१ ऑगस्टला रेशीमबाग मैदानावर महिलांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम सरकारी असला तरी यापूर्वी राज्यात इतर ठिकाणी झालेल्या अशाच प्रकारच्या कार्यक्रमातील राजकीय भाषणे लक्षात घेता त्याला संपूर्ण राजकीय स्वरूप येणार हे स्पष्ट आहे. मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री या कार्यक्रमाला येणार असून ५० हजार महिलांच्या उपस्थितीचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे.
सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी उमेदवारी देताना समान संधी धोरणानुसार महिलांचा विचार करावा तरच खऱ्या अर्थाने महिला सबलीकरणाचा उद्देश यशस्वी होईल. – कुंदा राऊत, काँग्रेस नेत्या व जि.प. उपाध्यक्ष.
हेही वाचा…मोठी बातमी! मोहन भागवत यांना मोदी, शहांच्या दर्जाची सुरक्षा; केंद्रीय गृहमंत्रालयाचा निर्णय
लाडकी बहीण योजना महिलांचा सन्मान करण्यासाठीच महायुती सरकारने जाहीर केली आहे. महिलांना संधी देण्याची भाजपची नेहमीच भूमिका राहिली आहे. या विधानसभा निवडणुकीत पक्षाने महिलांना अधिकाधिक संधी द्यावी, असा आग्रह आम्ही पक्षाकडे धरणार आहोत.– अर्चना डेहनकर, प्रवक्त्या, भाजप.