नागपूर : दोन वर्षांपासून प्रेमसंबंध ठेवत वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर प्रेयसीवर पळून जाऊन लग्न करण्यासाठी वारंवार दबाव टाकणाऱ्या प्रियकराविरुद्ध प्रेयसीने बलात्काराची तक्रार दिली. पोलिसांनी तक्रारीवरून युवकाला अटक केली. मोंटी हंसराज पसेरकर (२३, यशोधरानगर) असे आरोपीचे नाव आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यशोधरानगरमध्ये राहणारी पीडित १७ वर्षीय मुलगी रिटा (काल्पनिक नाव) सध्या पदवीच्या प्रथम वर्षाला शिक्षण घेत आहे. ती दहावीत असताना वस्तीत राहणाऱ्या मोंटी पसेरकरशी तिची ओळख झाली. मोंटी हा चारचाकी वाहने धुण्याचे काम करतो. रिटाची आई शाळेत नोकरी करते तर वडील व्यावसाय करतात. मोंटीचे वडील महापालिकेत स्वच्छता कर्मचारी आहेत. दोन वर्षांपूर्वी मोंटीने रिटाला प्रेमाच्या जाळ्यात ओढले होते. दोघांचे प्रेमसंबंध सुरळीत सुरू होते. गेल्या काही दिवसांपासून तो तिला शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकत होता. तिला नेहमी जंगलात नेऊन बळजबरी शारीरिक संंबंध ठेवत होता. गेल्या महिन्याभरापासून तो तिच्यावर लग्न करण्यासाठी वारंवार दबाव टाकत होता.

हेही वाचा – यवतमाळ : ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात सत्यपाल महाराजांच्या कीर्तनाची पर्वणी; ३५ हजार शेतकरी, लाभार्थ्यांच्या हजेरीचा प्रशासनाचा दावा

हेही वाचा – अकोला : थकबाकीचा डोंगर, वसुलीचे आव्हान; …तर गुन्हा दाखल होणार

रीटाला १८ वर्षे पूर्ण होण्यासाठी दोन आठवड्याचा अवधी बाकी आहे. त्यामुळे तो वय पूर्ण होताच पळून जाऊ लग्न करू, अशी बळजबरी करीत होता. मात्र, तिने शिक्षण पूर्ण करण्याचा हट्ट धरीत लग्नास नकार दिला होता. त्यामुळे मोंटीने तिला अपहरण करून लग्न करण्याची धमकी दिली. त्यामुळे ती घाबरली. १० ऑक्टोबरला मोंटीने तिला गाडीवर बसवले आणि घरी नेले. तेथे त्याने बळजबरी शारीरिक संबंध प्रस्थापित केले आणि पळून जाण्यासाठी तयारी करण्यास सांगितले. तिने घरी गेल्यावर आईला घडलेला प्रकार सांगितला. लग्न करायचे नसल्याचे आईला सांगून यशोधरानगर पोलीस ठाण्यात गेली. ठाणेदार ज्ञानेश्वर भेदोडकर यांना आपबिती सांगितली. या प्रकरणी पोलिसांनी मोंटीवर बलात्काराचा गुन्हा दाखल करून अटक केली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pressure to marry police complaint by girlfriend against boyfriend a case of rape has been registered adk 83 ssb