लोकसत्ता टीम

नागपूर: सोन्याच्या दरांमध्ये चढ- उतार थांबण्याचे नाव घेत नाही. नागपुरात २९ जानेवारीच्या सकाळी सराफा बाजार उघडल्यावर १०.३० वाजता २४ कॅरेट सोन्याचे दर ६२ हजार ८०० रुपये प्रति दहा ग्राम होते. हे दर तीनच तासानंतर दुपारी १.४१ वाजता ६३ हजार रुपये नोंदवले गेले. त्यामुळे सोन्याच्या दरात तब्बल ५०० रुपयांची वाढ झाली आहे.

सोने, चांदी, हिरे, प्लाटिनम धातूपासून तयार दागिने लग्न समारंभासह विविध सनात मोठ्या प्रमाणात नागरिकांकडून खरेदी करण्याचा कल वाढत आहे. नागपूर सराफा बाजारातील दरानुसार २९ जानेवारी २०२४ रोजीच्या दुपारी १.४१ वाजता २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम सोन्याचे दर ६३ हजार रुपये, २२ कॅरेटचा दर ५९ हजार ९०० रुपये, १८ कॅरेटचा दर ५० हजार ४०० रुपये, १४ कॅरेटचा दर ४१ हजार रुपये नोंदवले गेले. तर चांदीचा दर प्रति किलो ७२ हजार ४०० रुपये होता.

आणखी वाचा-बुलढाणा : खामगाव भूमी अभिलेख कार्यालयात शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न, यंत्रणांची तारांबळ…

दरम्यान नागपुरात तीन तासांपूर्वी म्हणजे २९ जानेवारीला सकाळी बाजार उघडल्यावर १०.३० वाजता २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम सोन्याचे दर ६२ हजार ८०० रुपये, २२ कॅरेटचा दर ५९ हजार ७०० रुपये, १८ कॅरेटचा दर ५० हजार २०० रुपये, १४ कॅरेटचा दर ४० हजार ८०० रुपये नोंदवले गेले. तर चांदीचा दर प्रति किलो ७२ हजार २०० रुपये होता. २५ जानेवारी २०२४ रोजी २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम सोन्याचे दर ६२ हजार ६०० रुपये, २२ कॅरेटचा दर ५९ हजार ५०० रुपये, १८ कॅरेटचा दर ५० हजार १०० रुपये, १४ कॅरेटचा दर ४० हजार ७०० रुपये नोंदवले गेले. तर चांदीचा दर प्रति किलो ७१ हजार ९०० रुपये होता. तर २४ जानेवारी २०२४ रोजी २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ६३ हजार रुपये, २२ कॅरेटचा दर ५९ हजार ९०० रुपये, १८ कॅरेटचा दर ५० हजार ४०० रुपये, १४ कॅरेटचा दर ४१ हजार रुपये नोंदवले गेले. तर चांदीचा दर प्रति किलो ७२ हजार २०० रुपये होता.

आणखी वाचा-११ फेब्रुवारीला पंतप्रधान मोदी यवतमाळात; वर्धा- यवतमाळ-नांदेड रेल्वेमार्गाचे उद्घाटन होणार?

यापूर्वीचे दर…

नागपूर सराफा बाजारात १५ जानेवारी २०२४ रोजी २४ कॅरेट सोन्यासाठी प्रति दहा ग्राम ६३ हजार रुपये, २२ कॅरेटचा दर ५९ हजार ९०० रुपये, १८ कॅरेटचा दर ५० हजार ४०० रुपये, १४ कॅरेटचा दर ४१ हजार रुपये नोंदवले गेले. तर चांदीचा दर प्रति किलो ७२ हजार ९०० रुपये होता. नागपूर सराफा बाजारातील व्यापाऱ्यांकडून हे दर आणखी वाढण्याचे संकेत दिले जात आहे.

Story img Loader