लोकसत्ता टीम

नागपूर : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी १ फेब्रुवारीला लोकसभा निवडणूकीपूर्वीचा शेवटचा अर्थसंकल्प सादर केला. त्याच्या दुसऱ्याच दिवशी नागपुरातील सराफा बाजारात सोन्याच्या दराने उसळी घेतली. शुक्रवारी (२ फेब्रुवारी) नागपुरात सोन्याचे दर प्रति दहा ग्राम ६३ हजार ५०० रुपये नोंदवले गेले. हा दर गेल्या काही महिन्यातील उच्चांक आहे, हे विशेष.

नागपुरातील सोन्याच्या दरांमध्ये चढ- उतार थांबण्याचे नाव घेत नाही. नागपुरात २ फेब्रुवारीच्या दुपारी २४ कॅरेट सोन्याचे दर ६३ हजार ५०० रुपये प्रति दहा ग्राम होते. हे दर २२ कॅरेटसाठी ६० हजार ३०० रुपये, १८ कॅरेटचा दर ५० हजार ८०० रुपये, १४ कॅरेटचा दर ४१ हजार ३०० रुपये नोंदवले गेले. तर चांदीचा दर प्रति किलो ७२ हजार ५०० रुपये होता.

आणखी वाचा-जाणता राजा महानाट्यापूर्वी शाब्दिक चकमकीचे राजकीय नाट्य…

दरम्यान नागपुरात २९ जानेवारीला सकाळी २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम सोन्याचे दर ६२ हजार ८०० रुपये, २२ कॅरेटचा दर ५९ हजार ७०० रुपये, १८ कॅरेटचा दर ५० हजार २०० रुपये, १४ कॅरेटचा दर ४० हजार ८०० रुपये नोंदवले गेले. तर चांदीचा दर प्रति किलो ७२ हजार २०० रुपये होता. तर २५ जानेवारी २०२४ रोजी २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम सोन्याचे दर ६२ हजार ६०० रुपये, २२ कॅरेटचा दर ५९ हजार ५०० रुपये, १८ कॅरेटचा दर ५० हजार १०० रुपये, १४ कॅरेटचा दर ४० हजार ७०० रुपये नोंदवले गेले. तर चांदीचा दर प्रति किलो ७१ हजार ९०० रुपये होता.

२४ जानेवारी २०२४ रोजी २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ६३ हजार रुपये, २२ कॅरेटचा दर ५९ हजार ९०० रुपये, १८ कॅरेटचा दर ५० हजार ४०० रुपये, १४ कॅरेटचा दर ४१ हजार रुपये नोंदवले गेले. तर चांदीचा दर प्रति किलो ७२ हजार २०० रुपये होता. दरम्यान सोन्याच्या दरात सतत बदल होत असले तरी काही महिन्यात हे दर ६५ हजार रुपये प्रति दहा ग्रामपर्यंत जाण्याची शक्यता नागपुरातील सराफा व्यापाऱ्यांकडून वर्तवली जात आहे.

Story img Loader