नागपूर: नागपूरसह राज्यभरात शनिवारी (७ सप्टेंबरला) सकाळपासून श्री गणेशाचे वाजात- गाजत आगमन होत आहे. सर्वत्र प्रतिष्ठापना होत असतांनाच गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी नागपुरात बाजार उघडताच सकाळी सोन्याच्या दरात घट झाली आहे. सोन्याचे दर घसरल्याने दागिने खरेदीसाठी इच्छुक असलेल्या महिलांसह इतरही ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

केंद्रीय अर्थसंकल्पानंतर नागपूरसह देशात प्रथम सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली होती. परंतु त्यानंतर कधी दर वाढले तर कधी कमी होत आहेत. नागपुरातील सराफा बाजारात ३१ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ७१ हजार ९०० रुपये, २२ कॅरेटसाठी ६६ हजार ९०० रुपये, १८ कॅरेटसाठी ५६ हजार १०० रुपये, १४ कॅरेटसाठी ४६ हजार ७०० रुपये होते. तर प्लॅटिनमचा दर ४४ हजार रुपये प्रति दहा ग्राम होता. हा दर जन्माष्टमीच्या दिवशी २६ ऑगस्टला २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ७२ हजार रुपये, २२ कॅरेटसाठी ६७ हजार रुपये, १८ कॅरेटसाठी ५६ हजार २०० रुपये, १४ कॅरेटसाठी ४६ हजार ८०० रुपये होता.

Yenpure gang , Katraj , Leader Yenpure gang arrested
पुणे : कात्रज भागातील येनपूरे टोळीच्या म्होरक्याला बारामतीतून अटक, मोक्का कारवाईनंतर दोन वर्ष पसार
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Gold Silver News
Gold Silver Price Today : मकर संक्रांतीच्या दिवशी सोने खरेदी करताय? जाणून घ्या, तुमच्या शहरातील आजचा सोने चांदीचा भाव
gold silver rate today, Gold Silver Price 11 january 2025
Gold Silver Rate Today : सोन्या-चांदीच्या दरातील वाढ सुरूच, आज २२, २४ कॅरेट सोन्याचा दर काय? जाणून घ्या
pune gold jewellery stolen loksatta news
पुणे : कर्वेनगर भागातील बंगल्यात चोरी
Error in gold import data due to double counting government clarification
दुहेरी मोजणीमुळे सोने आयातीच्या आकडेवारीत चूक – सरकारची स्पष्टोक्ती
Gold and silver ornaments worth 15 lakhs on idol of goddess were robbed
देवीच्या मूर्तीवरील १५ लाखाचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास
Silver prices fall and gold prices also change
चांदीच्या दरात घसरण… सोन्याच्या दराने…

हे ही वाचा..नागपूर : नेत्यांची विश्वसनीयता कमी होतेय, कारण लोकांना मूर्ख बनविणे…..गडकरी थेटच बोलले….

७ सप्टेंबरला नागपुरात दुपारी सोन्याचे दर २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ७१ हजार ७०० रुपये, २२ कॅरेटसाठी ६६ हजार ७०० रुपये, १८ कॅरेटसाठी ५५ हजार ९०० रुपये, १४ कॅरेटसाठी ४६ हजार ६०० रुपये होते. त्यामुळे सोन्याच्या दरात घसरण झाल्याचे चित्र आहे. दरम्यान आजही शहरात वाढदिवस, बारसे, लग्नसमारंभासह इतर कामासाठी बरेच नागरिक सोने- चांदीचे दागिनेसह इतरही भेटवस्तू देत असतात. त्यामुळे दागिने खरेदीसाठी आजही शहरातील सराफा व्यावसायिकांकडे कमी- अधिक गर्दी दिसते. या ग्राहकांमध्ये सर्वाधिक ग्राहक महिला असतात. त्यामुळे दर कमी झाल्याचा सर्वाधिक आनंद हा महिलांनाच होणार आहे.

चांदीच्या दरातही घसरण

नागपुरातील सराफा बाजारात २६ ऑगस्टला चांदीचे दर प्रति किलो तब्बल ८५ हजार ६०० रुपये नोंदवण्यात आले होते. हे दर गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी ७ सप्टेंबरला नागपुरात दुपारी ८४ हजार २०० रुपये प्रति किलो नोंदवण्यात आले. त्यामुळे चांदीच्या दरातही मोठी घट झालेली दिसत आहे. हे दर तब्बल १ हजार ४०० रुपयांनी घसरले आहे. दरम्यान गणेसोत्सवात चांदीचे श्री गणेशाची मूर्ती, नाणेसह इतरही वस्तू ग्राहकांकडून घेतल्या जातात. त्यामुळे या वस्तू खरेदीचा बेत असलेल्यांना लाभ होणार आहे.

Story img Loader