लोकसत्‍ता टीम

अमरावती : यंदा नैसर्गिक आपत्तीचा तुरीच्या पिकाला जोरदार फटका बसला. त्यामुळे उत्पादन घटले आहे. मर्यादित उत्पादन लक्षात घेता तुरीचा दर वाढला आहे. अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुरीला विक्रमी दर मिळत असून तुरीच्या भावाने १० हजारांचा टप्पा ओलांडला आहे. अमरावती कृषी उत्‍पन्‍न बाजार समितीत शुक्रवारी ५ हजार ८५० क्विंटल तुरीची आवक झाली. तुरीला किमान ९ हजार रुपये तर कमाल १० हजार ५०० म्‍हणजे सरासरी ९ हजार ७५० रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला.

mmrda acquire farmers lands in 124 villages of uran panvel and pen for third mumbai
भूसंपादनाविरोधात शेतकऱ्यांची एकजूट; उरण, पनवेलमधील १२४ गावे संपादित करण्याची अधिसूचना
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Solapur jowar crops loksatta news
सोलापूर : ज्वारीच्या कोठारात यंदा ज्वारीचा पेरा निम्म्यावर, लांबलेल्या पावसाचा परिणाम
Property tax defaulters properties seized in Titwala
टिटवाळा येथे कर थकबाकीदारांच्या दोन कोटीच्या मालमत्तांना टाळे, पालिकेच्या अ प्रभागाची कारवाई
Ration Distribution delayed due to technical difficulties Nagpur news
 ‘सर्व्हर डाऊन’ ! राज्यात स्वस्त धान्य वाटप रखडले…
Sugarcane Cultivation Kolhapur , Sugarcane ,
लोकशिवार… मुरमाड जमिनीतील उसाची दमदार लागवड
pune municipality suffered financial loss due to state government decision
Pune Municipal Corporation : महापालिकेला का सोसवेना समाविष्ट गावांचा भार, काय आहे नक्की कारण?
29 villages Vasai Virar, Vasai Virar Municipal Corporation, Vasai Virar,
२९ गावांचा वसई विरार महापालिकेत समावेश, ३१ हजार हरकतींवर जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी

खरीप हंगामाच्या सुरुवातीला मान्सून पावसाचे विलंबाने आगमन झाले. हंगामाचा सुरुवातीचा काळ कोरडा गेल्याने खरीपामध्ये पेरण्या उशिराने झाल्या. त्यामुळे यंदाचा हंगाम लांबला आहे. त्यातच सुरुवातीला अपुरा पाऊस व त्यानंतर अवकाळी पावसाने तुरीच्या पिकावर विपरित परिणाम झाला. तुरीचे पीक ऐन फुलधारणेच्या अवस्थेत असताना अवकाळी पावसामुळे नुकसान झाले. ढगाळ वातावरण व अळीच्या प्रकोपामुळे तुरीच्या पिकाची अतोनात हानी झाली. तुरीवर विविध किडींचा देखील प्रादुर्भाव झाला. या सर्व प्रकारामुळे खरीप हंगामातील तूर पिकांच्या उत्पादनात प्रचंड घट झाली. सध्या तुरीची सोंगणी व काढणी केली जात आहे. जिल्ह्यात उत्पादनात प्रचंड घट झाल्याचे दिसून येत आहे. एकरी एक ते दोन क्विंटलच उत्पादन निघत आहे. शेतकऱ्यांच्या घरात तूर आल्यावर ती बाजारपेठेत विक्रीसाठी आणली जात आहे. येत्या काळात बाजार समितीमध्ये आवक वाढण्याची शक्यता आहे.
यंदा बाजारातील कमी आवक आणि सरकारी खरेदीचाही तूर बाजाराला आधार मिळत आहे. तुरीच्या भावातील तेजी पुढील काळातही कायम राहू शकते, असा अंदाज आहे. एरवी ऐन आवकेच्या हंगामात तुरीच्या भावावर दबाव आलेला असतो.

आणखी वाचा-वर्धा : अनैतिक संबंधास विरोध; मुलाने आईच्या डोक्यात घातला वरवंटा

तुरीचे दर सरासरी नऊ ते दहा हजार रुपयांवर आहेत. उत्पादित तुरीचा उताराही कमी मिळत आहे. त्यामुळे तुरीचे दर वर्षभर तेजीत राहण्याचा अंदाज आहे. मागील हंगामात सरकारने फारशी तूर खरेदी केली नव्हती. चालू वर्ष निवडणुकीचे असल्यामुळे केंद्र सरकार अन्नधान्यांच्या भाववाढीविषयी सतर्क आहे. त्यामुळे सरकारने सवलतीच्या दरातील आयातीचे धोरण स्वीकारले आहे. केंद्र सरकारनेही हमीभाव सात हजार रुपये प्रति क्विंटल असताना हमीभावापेक्षा जास्त दर देत बाजारभावाने खरेदी सुरू केली आहे. पुढील काळात भावात तेजीत राहण्याची शक्यता असल्याने व्यापारी, प्रक्रियादारही खरेदीत उतरले आहेत. त्यामुळे तुरीच्या भावात वाढ झाली आहे. शेतकरीही भाववाढीच्या अपेक्षेने टप्याटप्प्याने तूर विक्री करीत आहेत. त्यामुळे बाजारात वर्षभर तुरीची आणि तूरडाळीची काहीशी टंचाईची स्थिती राहून, दरही तेजीत राहण्याची शक्यता आहे.

Story img Loader