वाशीम : मालेगाव तालुक्यातील मुसळवाडी आदिवासी बहुल भाग. येथून तालुक्याचे ठिकाणदेखील दूर आहे. त्यामुळे नागरिकांना किरकोळ उपचारासाठी तालुक्याला जावे लागते. त्यामुळे येथे ८ कोटी रुपये खर्चून टोलेजंग प्राथमिक आरोग्य केंद्र बांधण्यात आले. परंतु अद्यापही ते कार्यान्वित करण्यात आले नाही. त्यामुळे तातडीने आरोग्य केंद्र सुरू करण्याची मागणी होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मालेगाव तालुक्यातील मुसळवाडी येथे दवाखाना इमारत बांधकाम, कर्मचारी निवासस्थान, आवारातील रस्ते यासाठी ८ कोटी रुपये खर्च करून टोलेजंग प्राथमिक आरोग्य इमारत बांधकाम करण्यात आले आहे. संबंधित कंत्राटदाराची बिलेदेखील अदा केली आहेत. इमारत सुसज्ज स्थितीत उभी असतानासुद्धा अधिकृतरित्या जनतेच्या सेवेत रुजू करण्यात आली नसल्याने नागरिकांत तीव्र रोष व्यक्त केला जात आहे.

हेही वाचा – वर्धा: अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर

पावसाळा तोंडावर असल्याने आगामी काळातील रोगराईचा विचार करून जुलैमध्ये सदर प्राथमिक आरोग्य केंद्र जनतेच्या सेवेत रुजू करावे, अशी मागणी सुभाष देवढे पाटील यांनी राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्याकडे केली आहे.