नागपूर : दिल्ली येथे आयोजित ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार हे आता स्पष्ट झाले आहे. या संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार यांनी संमेलनाच्या उद्घाटनासाठी मोदींना निमंत्रित केले होते. ते निमंत्रण मोदींनी स्वीकारले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

शुक्रवार २१ फेब्रुवारी २०२५ रोजी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. त्याबाबतची स्वीकृती पंतप्रधानांनी दिल्याची माहिती शरद पवार यांनी अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या अध्यक्ष उषा तांबे यांना कळवली. उद्घाटनीय कार्यक्रमाचे स्थळ ,स्वरूप, वेळ तसेच इतर रूपरेषा महामंडळ, संयोजक संस्था आणि स्वागताध्यक्ष शरद पवार यांच्या बैठकीनंतर जाहीर केली जाईल. संमेलनाला पंतप्रधान येणार असल्याने सुरक्षा व्यवस्थेमुळे संमेलनस्थळी बैठक व्यवस्थेत करावे लागणारे बदल, या सर्व बाबी लक्षात घेता संमेलनाचे उद्घाटन विज्ञान भवनात करायचे व त्याचे थेट प्रसारण तालकटोरा मैदानात संमेलनस्थळी करायचे, अशाही एक पर्यायावर आयोजकांकडून विचार सुरू आहे.