नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वामित्व योजनेंतर्गंत मालकी पट्टे मिळालेल्या काही निवडक लाभार्थ्यांशी दूरदृश्यप्रणालीद्वारे संवाद साधला. यात नागपूर जिल्ह्यातील रोशन पाटील यांना संधी देण्यात आली.मोदींनी रोशन पाटील यांच्याशी मराठीतून संवाद साधला.मोदींनी देशातील १० राज्ये आणि दोन केंद्र शासित प्रदेशातील लाभार्थ्यांशी प्रातिनिधीक संवाद साधला. महाराष्ट्रातून नागपूर जिल्ह्याच्या भिवापूर तालुक्यातील मौजा मल्हापूर, गट ग्रामपंचायत धापरला (डोये) येथील रोशन पाटील यांची निवड करण्यात आली. यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे रोशन पाटील यांच्या शेजारी बसले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मोदींनी संवादाची सुरुवातच मराठीतून केली. पाटील यांना स्वामित्व योजनेचा मिळालेला लाभ, शासनाची मदत, त्याचा झालेला फायदा याविषयीची माहिती मोदींनी सुमारे पाच मिनिटांच्या संवादातून करून घेतली. संवादादरम्यान लाभार्थी रोशन पाटील यांच्या शर्विल या मुलाचा वाढदिवस असल्याचे त्यांना सांगताच तत्काळ त्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या. कुटुंबातील सदस्यांची संख्या, स्वतः काय करता याचीही आस्थेवाईकपणे त्यांनी विचारपूस केली.

हेही वाचा…हत्ती जाणार रजेवर…कारण वाचून म्हणाल, आपणही थंडीत…

मालकी पट्टयामुळे कर्ज घेता आले घराच्या जागेचा मालकी पट्टा मिळाल्याने घरावर कर्ज घेता आले. बँकेकडून नऊ लाख कर्ज घेतले. काही पैसे घराला तर काही पैसे शेतीला लावले. शेतीतून फायदा होत असल्याचे रोशन पाटील यांनी सांगितले. बँकेकडून कर्ज घेण्यास पूर्वी अडचण यायची. या योजनेमुळे कर्ज मिळणे सुकर झाल्याचे त्यांनी सांगितले. केंद्र सरकारच्या कुठल्या योजनांचा लाभ मिळाल्याचे मोदी यांनी विचारले. यावर उज्ज्वला गॅस योजना, पीएम सन्मान निधी योजना, पीक विमा योजनेचा लाभ मिळाल्याचे सांगत स्वामित्व योजनेचा लाभ दिल्याबद्दल पाटील यांनी मोदींचे आभार मानले.

हेही वाचा…‘समृद्धी’वर पुन्हा डुलकी ठरली घातक…कारची ट्रकला धडक; एक ठार, दोन जखमी…

८७ पारधी विद्यार्थ्यांचे जात प्रमाणपत्रांचे अर्ज मान्य

राज्यातील १५ हजार गावातील नागरिकांना स्वामित्व योजनेतील पहिल्या टप्प्यात मालमत्ता कार्ड मिळणार आहे, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी दिली. पारधी समाजातील विद्यार्थ्यांचे दोन वर्षांपासून जात प्रमाणपत्रासाठीचे अर्ज अडवून ठेवण्यात आले होते. त्यासंदर्भातील वृत्ताची सरकारने दखल घेतली आणि काही तासांत ८७ विद्यार्थ्यांचे अर्ज मान्य करण्यात आले. यापुढे विद्यार्थ्यांना अडचण जाणार नाही. अशी व्यवस्था करण्यात येईल, असेही बावनकुळे म्हणाले

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prime minister modi interacted in marathi with beneficiaries of swamitwa scheme roshan patil from nagpur rbt 74 sud 02