चंद्रपूर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ८ एप्रिल रोजी सायंकाळी ४ वाजता मोरवा येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान मोदी चंद्रपुरात येत आहेत. मोरवा विमानतळालगत १६ एकर शेतात ही जाहीर सभा होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सभेसाठी किमान पाच ते सात हजार वाहने ग्रामीण भागातून येणार असल्याने वाहनतळाची व्यवस्था करण्यात येत आहे. जिल्हा निवडणूक अधिकारी विनय गौडा तथा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी सभास्थळाची पाहणी केली. भाजप कार्यकर्तेदेखील सभास्थळ पाहून आलेत.

हेही वाचा…वाघाच्या हल्ल्यात गावकरी ठार, सहा वर्षांत ४२१ जण मृत्युमुखी

सभेची जय्यत तयारी सुरू असून ती यशस्वी करण्यासाठी महायुतीचे कार्यकर्ते कामाला लागले आहेत. या सभेला गडचिरोली-चिमूर आणि यवतमाळ-वाशीम मतदारसंघातील उमेदवारही उपस्थित राहणार आहेत.