लोकसत्ता टीम
गोंदिया: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात ‘ कार्यक्रमाकरिता केली जाणारी जाहिरात शासकीय धनाची बरबादी आहे. ही देशातील गोर गरीब जनतेच्या घामाच्या पैशाची उधळपट्टी आहे, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे . १ मे सोमवार ला महाराष्ट्र दिनानिमित्त जिल्ह्यात आले असताना ते माध्यमांशी बोलत होते.
पंतप्रधान मोदींनी ‘ मन की बात ‘ ऐवजी आता जन की बात करायला हवी , ज्यांना या देशाची लोकशाही मान्य नसेल ते आपल्या ‘मन की बात ‘ बोलतात आणि त्याचाच प्रत्यय आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा माध्यमातून बघायला मिळत आहे. लोकशाही मध्ये जनतेच्या मनातला एकून सत्तेमध्ये ज्या लोकांना जनतेने बसविलेला आहे त्या लोकांनी जनतेसाठी काम करावं ही लोकशाही,पण नोटबंदी, जीएसटी सारखं निर्णय आणि सातत्त्याने वाढलेली बेरोजगारी, महागाई, शेतकऱ्यासाठी आणलेले तीन काळे कायदे, देशातील सार्वजनिक उपक्रम विक्री करून देश चालविण्याचा पाप केलं जात आहे आणि वरुन शासकीय धनाची उधळण करून ‘ मन की बात ‘ सांगून देशाच्या लोकांना भूलथापा देण्याचं काम केलं जात आहे.
आणखी वाचा- नक्षलग्रस्त भागातील विद्यार्थिनी पालकमंत्री फडणवीस यांना म्हणाल्या, आम्हाला…
त्याच्यामुळे ते स्वतः हुन किती ही वाहवाही करो, सुरुवातीला त्यांच्या ‘मन की बात ‘ एकायला लोकांची उत्सुकता दिसायची,पण कालांतराने त्यांची ही ‘मन की बात ‘ ऐकणे आता लोकांना कंटाळवाणा वाटू लागल्यामुळे एकने बंद केलं आहे. त्यामुळे आता ‘मन की बात ‘ ची एक आठवडा पूर्वी पासून जाहिरात करावी लागत आहे. आणि ती जाहिरात पण जनतेच्याच पैशांनी, अखेर ‘मन की बात ‘ हा शासकीय कार्यक्रम आहे.
जनतेच्या घामाच्या पैशातून हा कार्यक्रम केला जातो. आणि जेव्हा जनतेच्या घामाच्या पैशाची अशी ही उधळपट्टी केली जात असेल तर यातून जनतेला काय मिळालं असेल. या १०० व्या ‘मन की बात ‘ मध्ये प्रश्न आपण विचारलं तर यातून जनतेला शून्य मिळालेलं असल्याचे निष्पन्न होईल, अशी टीका पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा १०० व्या ‘मन की बात ‘ कार्यक्रमाचा मोठा गाजावाजा केल्या वरुन केली.