लोकसत्ता टीम

चंद्रपूर: खासगी शाळांचे शिक्षक विद्यार्थांसाठी भर उन्हात दारोदारी भटकत आहेत. पालकांना मोफत प्रवेश, स्कूल बॅग, वह्या, पुस्तके, स्कूल बस, प्रसंगी पैसे द्यायचे आमिष दाखवले जात आहे. अशातच विद्यार्थी व पालकांनी संमती न घेताच मुख्याध्यापकाने विद्यार्थ्यांचे शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र अर्थात टीसी खासगी शाळेच्या मुख्याध्यापकाला दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा गंभीर प्रकार माहिती होताच विद्यार्थी व पालकांनी शाळेत गोंधळ घालत मुख्याध्यापकाला जाब विचारला. दरम्यान ही घटना मुल तालुक्यातील कांतापेठ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत घडली आहे.

Due to assembly elections instructions have issued regarding school continuity on November 18 19
शाळा सुरू ठेवण्याबाबत शिक्षण आयुक्तांच्या सुधारित सूचना… होणार काय?
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Video Story Of Ravindra Dhangekar And Devendra Fadnavis.
Ravindra Dhangekar: “निवडणूक हरत असल्याचे लक्षात येताच…” फडणवीसांच्या ‘ॲक्सिडेंटल आमदार’ टीकेला धंगेकरांचे प्रत्युत्तर; पाहा व्हिडिओ
Three days holiday in school
तीन दिवसांची सुट्टी! मतदानावर काय परिणाम…
Govt Issues New Rules To Stop Misleading Ads By Coaching classes
विश्लेषण : शिकवणी वर्गांच्या जाहिरातींना चाप?
mallikarjun kharge replied pm narendra
“पंतप्रधान मोदी म्हणजे ‘झुटों के सरदार’, त्यांनी हेच लाल संविधान…”; ‘त्या’ टीकेला मल्लिकार्जून खरगेंचं प्रत्युत्तर!
Tula Shikvin Changlach Dhada
भुवनेश्वरी आणि चारुलताच्या गोंधळात अक्षराच वेडी ठरणार; नेटकरी म्हणाले, “शिक्षिका असून सुद्धा…”

मूल पंचायत समिती अंतर्गत कांतापेठ येथे जिल्हा परीषदेची प्राथमिक शाळा आहे. इयत्ता १ ते ४ पर्यंत वर्ग असलेल्या या शाळेत गावातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शाळेच्या मुख्याध्यापकाने निकाल लागण्यापूर्वीच पालकांची संमती न घेताच, विद्यार्थीनीचे शाळा सोडल्यांचे दाखले स्वत:च्या मर्जीनेच चिरोली येथील एका शाळेच्या शिक्षकांना दिल्यांने संतप्त पालकांनी कांतापेठ शाळेत आज गोंधळ घातला. मुख्य म्हणजे काल बुध्द पोर्णिमेची सार्वजनिक सुट्टी असताना, कालच त्यांनी आजच्या तारखा टाकून टि.सी. दिल्यांने सदर प्राकारात आर्थिक व्यवहार झाल्यांचा आरोप पालकांनी मूल पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केला आहे, पालकांनी मुख्याध्यापकांच्या कक्षात घातलेला गोंधळाचे​ व्हिडीओ समाजमाध्यमात चांगलेच वायरल होत आहे.

आणखी वाचा-‘एनजीटी’कडून ‘एसीसी सिमेंट’ कारखान्याच्या चौकशीचे आदेश; अदानी समूहाचा कारखाना

शहरासोबतच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय मिळावी म्हणून शासनाने खिरापती घेवून गांव तेथे शाळा मंजुर केल्या. त्यामुळे अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांची वाणवा दिसत असून पुरेश्या विद्यार्थ्यां अभावी वर्ग तुकडी बंद पडत असून परिणामी शिक्षकांवर त्याचा विपरीत परिणाम पडत आहे. त्यामुळे पुरेशी विद्यार्थी संख्या जुळविण्यासाठी शाळाच नव्हे तर कनिष्ठ व वरीष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांना विद्यार्थ्यांसाठी शोध मोहीम राबवावी लागत आहे. नोकरी वाचविण्यासाठी शिक्षकांनाही आर्थिक भार सोसावा लागत असून तहाण भूक आणि वातावरण विसरून शिक्षकांना विद्यार्थ्यांसाठी पायपीठ करावी लागत असून त्यातूनच कांतापेठ येथे सदरचा प्रकार घडल्याचे बोलल्या जात आहे. कांतापेठ लगतच्या चिरोली येथील अनुदानीत शाळेत विद्यार्थाची संख्या कमी असल्यांने, पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी चढाओढ सुरू आहे. आपल्याला ​पाचवीचे विद्या​र्थी मिळावे यासाठी प्रत्येक शिक्षक जिल्हा परिषद शाळेत संपर्क साधत असून, जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुख्याध्यापकांना आर्थिक प्रलोभने दाखविली जात आहे. असाच आर्थिक लाभ मिळविण्यांकरीता कांतापेठ येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक दिलीप कुमरे यांनी शाळेचा निकाल लागण्यापूर्वीच सुट्टीचे एक दिवस आधीच सर्व विद्यार्थाच्या शाळा सोडल्याचे दाखले चिरोलीच्या शाळेत परस्पर दिले आहे.

आणखी वाचा-मस्तच! भारत गौरव पर्यटन रेल्वे नागपूरमार्गे धावणार, ७ रात्र, ८ दिवस आणि शुल्क मात्र…

शासनाचे निर्णयानुसार ६ मे रोजी​ निकाल जाहीर करण्यांचे आदेश होते. यानुसार विद्यार्थी निकाल घेण्याकरीता शाळेत गेले असता वर्गशिक्षिकेने निकाल तयार व्हायचे असल्यांचे सांगीतले, मात्र मुख्याध्यापकांनी शाळा सोडल्याचे दाखले चिरोलीच्या शाळेत दिल्यांचे सांगताच, पालकांनी शाळेत धाव घेत आमच्या संमतीशिवाय शाळा सोडल्याचे दाखले दुसऱ्या व्यक्तीच्या हातात कसे दिले ? असा संतप्त सवाल केला.

मुख्याध्यापक कुमरे यांचेशी संपर्क साधला असता, होय, मी आजची तारीख टाकून, कालच टिसी दिल्या. हा माझा अधिकार आहे, कोण काय करते ते मी पाहून घेईल, असे उत्तर दिले. पालकांचे तक्रारीनुसार गटशिक्षणाधिकारी यांचेशी संपर्क साधला असता, मुख्याध्यापक यांची कृती गंभीर असून, कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी प्रतिक्रिया दिली. मिळालेल्या विश्वसनीय माहीतीनुसार, चिरोलीच्या शाळा व्यवस्थापनाकडून मुख्याध्यापक कुमरे यांना प्रति टिसी पाच हजार रूपये दिल्याची परिसरात चर्चा असून या प्रकरणाच्या तक्रारीवर गटशिक्षणाधिकारी कोणती कारवाई करतात याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.