भारतीय शहरी वाहतूक परिषदेच्या उद्घाटनात मुख्यमंत्र्यांची ग्वाही

राज्यामध्ये मुंबई, पुणे व नागपूर येथे मेट्रोची कामे वेगात सुरू असून ही कामे वेळेत पूर्ण करण्यात येतील. आगामी काळात ई-बसेस तसेच अन्य पर्यायी इंधनांचा वापर करून प्रदूषण कमी करणारी, सर्वाना परवडेल अशी व पर्यावरणपूरक  सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उभारण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  सांगितले.

Order of Additional Commissioner to remove encroachments of illegal crackers stalls on roads and footpaths
रस्त्यांवर, पदपथांवर उभे राहिले बेकायदा फटाके स्टॉल, कोण आहे जबाबदार!
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट…
Nagpur, food vendors Nagpur, Traffic congestion Nagpur, food vendors encroachment Nagpur,
नागपूर : खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडून हप्तेखोरीतून लाखोंची उलाढाल; नागरिकांकडून चौकशीची मागणी
Traffic changes in Baner Road area due to Metro works  Pune
मेट्रोच्या कामानिमित्त बाणेर रस्ता परिसरात वाहतूक बदल
Mumbai police arrest four Lawrence Bishnoi gang members
लॉरेन्स बिष्णोई टोळीशी संबंधित चौघे जण ताब्यात; मुंबई पोलिसांकडून कर्वेनगर भागात कारवाई
MVA joint press conference
MVA Seat Sharing : महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा तिढा सुटला? रमेश चेन्निथलांनी दिली महत्त्वाची माहिती
Which city in india is known for city of joy know details
भारतातील ‘या’ शहराला म्हणतात ‘सिटी ऑफ जॉय’, यामागचं नेमकं कारण काय? जाणून घ्या…
pune it city Server down
लोकजागर : आयटी सिटीचा सर्व्हर डाउन!

चिटणवीस सेंटर येथे केंद्रीय नगरविकास आणि गृहनिर्माण विभागाच्या वतीने आयोजित ११व्या भारतीय शहरी वाहतूक परिषदेचे व प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

यावेळी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय नगरविकास व गृहनिर्माण राज्यमंत्री हरदीप सिंग पुरी, महापौर नंदा जिचकार, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, फ्रान्सचे राजदूत अलेक्झांडर झिगलर, जर्मनीचे राजदूत डॉ. मार्टीन ने, सचिव दुर्गाशंकर मिश्रा, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मान्यवरांनी प्रदर्शनातील विविध स्टॉल्सना भेट देऊन पाहणी केली. मान्यवरांच्या हस्ते हॅकेथॉनचे उद्घाटन करण्यात आले. ‘हरित शहरी वाहतूक’ ही  यंदाच्या परिषदेची संकल्पना आहे.

नागरीकरणाचा वेग वाढत आहे. भविष्यात तो अधिक झपाटय़ाने वाढणार आहे.  दर्जेदार वाहतूक सुविधा उपलब्ध असणाऱ्या ठिकाणी नागरीकरण एकवटत असल्याचे आढळून येत आहे. यापुढे आपल्या शहरांचा दर्जा तेथील वाहतूक सुविधा व व्यवस्थेवर ठरणार आहे. वाहतुकीमुळे प्रदूषणात वाढ होते. ही बाब खरी आहे. यामुळे यावर उपाय शोधणेही गरजेचे आहे. यासाठी सर्वाना परवडेल अशी, पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उभारण्यावर भर देण्यात येत आहे.

पर्यायी इंधन तसेच वाहतूक व्यवस्थेसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले,  रस्ते बांधणीत क्रांती होत आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सर्वासाठी  उपयुक्त ठरली पाहिजे. या पाश्र्वभूमीवर मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत समन्वय साधण्यात येत आहे. राज्यात ई-बसेस तसेच इलेक्ट्रिकवरील वाहनांच्या वापरास प्रोत्साहन देण्यात येत आहे.

यावेळी  केंद्रीय नगर विकास व गृह निर्माण राज्यमंत्री हरदीप सिंग पुरी यांचेही भाषण  झाले. फ्रान्सचे भारतातील राजदूत अलेक्झांडर जिगलर, जर्मनीचे राजदूत मार्टिन नी यांनीही पर्यावरणपूरक वाहतुकीसाठी भारताला मदतीचे आश्वासन दिले.  प्रास्ताविक सचिव दुर्गाशंकर मिश्रा यांनी केले, तर आभार महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी मानले.

नागपूर मेट्रो प्रकल्प पथदर्शी

राज्यभरात मेट्रो कॉरिडॉर अंतर्गत मेट्रोची कामे वेगात सुरू असून नागपूर येथील महामेट्रोचे प्रकल्प पथदर्शी ठरत आहे. राज्यातील मेट्रो कॉरिडॉर अंतर्गत ५७०  किलोमीटर लांबीची कामे आहेत. यापैकी ४०० किलोमीटरच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे, तर २६० किलोमीटरची कामे सुरू करण्यात आली आहेत. राज्यातील मेट्रोची सर्व कामे वेळेत पूर्ण करण्यात येतील, अशी ग्वाही फडणवीस यांनी यावेळी दिली.

ब्रॉडगेज मेट्रोमुळे मोठे बदल – गडकरी

केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी म्हणाले, प्रदूषण टाळण्यासाठी विजेवरील वाहतूक ही काळाची गरज आहे. भविष्यात ब्रॉडगेज मेट्रोच्या उभारणीद्वारे मोठे बदल घडणार आहेत. पर्यावरणाचे संरक्षण तसेच सर्वाना परवडणारी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उभारण्यासाठी बायोफ्यूएल, इथेनॉल, सौरऊर्जा तसेच वीज यासारख्या  पर्यायी इंधनांचा वापर करावाच लागेल. याबरोबरच आता जल वाहतुकीलाही चालना देण्यात येत आहे. डोंगराळ भागामध्ये केबल कार व रोपवे सारखे पर्याय उपयुक्त ठरू शकतात. यांनाही चालना देऊन सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करण्यात येत आहे.