गोंदिया: पत्नीला माहेरी सोडून आपल्या मुलीसोबत स्वगावी (देवरी) परतणाऱ्या दुचाकी चालकाला ट्रॅव्हल्सने धडक दिल्याने घडलेल्या अपघातात  दुचाकी चालक वडील व चिमुकलीच्या जागीच मृत्यू झाला . सडक अर्जुनी तालुक्यातील खडकी बाह्यणी येथे शुक्रवारी १४ फेब्रुवारी रोजी रात्री साडेआठ ते नऊच्या सुमारास ही घटना घडली. सूरजलाल वासाके (३२) व वेदिका सूरजलाल वासाके (४) असे या घटनेतील मृतकांची नाव आहेत. या ठिकाणी अग्रवाल ग्लोबल कंपनीच्या निर्माणधीन रस्ता बांधकामामुळे एकेरी वाहतूक सुरू आहे. दुसऱ्या मार्गावर रस्ता खोदून असल्यामुळे सदर अपघात घडला .याबाबतची तक्रार स्थानिक नागरिकांनी सडक अर्जुनी तालुक्यातील डुग्गीपार पोलीस ठाणे येथे केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर ते रायपूर महामार्ग क्रमांक ५३ वर ग्राम बाह्यणी  खडकी जवळ एकेरी वाहतूक सुरू असल्यामुळे तेथे अपघात वाढले. तीन दिवसांमध्ये घडलेला तिसरा अपघात आहे. अग्रवाल ग्लोबल कंपनीच्या निष्काळजीपणामुळे  आणखी किती लोकांचा जीव घेणार असा प्रश्न येथील नागरिकांनी केला आहे.  १४ फेब्रुवारी च्या रात्रीला ८:३० ते ९ वाजताच्या सुमारास देवजीटोला जवळील पुलाजवळ सडक अर्जुनी तालुक्यातील कोहमारा कडून देवरीला मोटरसायकल ने वडील आणि मुलगी जात होती. पण एकेरी वाहतूक सुरू असल्यामुळे व दुसरा रस्ता खोदून ठेवल्यामुळे मोटरसायकल चालकांना कमालीचा त्रास होतो. देवरीच्या दिशेने येणारी ट्रॅव्हल्स (क्रमांक सी.जी.१९ एफ ०३२६ )ही भर वेगात होती. तिने मोटरसायकलला जोरदार धडक दिली. या धडकेत वडील सूरजलाल वासाके (३२) व  चिमुकली वेदिका सूरजलाल वासाके (४) चा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातानंतर

ब्राह्मणी खडकी येथील व परिसरातील संतप्त नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केले .देवरीचे  उपविभागीय पोलिस अधिकारी विवेक पाटील यांनी घटनास्थळ गाठून  संतप्त नागरिकांची समजूत घातली.  बंद महामार्ग सुरू केला.