नागपूर : अपंगांसाठी ऑनलाईन रेल्वे तिकीट सुविधा नसल्याने त्यांना तिकीट खिडकीवर रांगेत लागूनच तिकीट खरेदी करावी लागते. रेल्वे तिकीट ऑनलाईन झाल्याने तिकीट खिडकीवरील रांगा कमी झाल्या आहेत. मात्र, ही सुविधा अपंग व्यक्तींना उपलब्ध नाही.

इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी) रेल्वे तिकिटांची ऑनलाईन विक्री करीत असते. आयआरसीटीसीने यासाठीच्या संगणकीकृत प्रणालीमध्ये अपंग ‘कोट्याचा’ समावेश केलेला नाही. त्यामुळे अपंगांना अजूनही रांगेत लागून तिकीट खरेदी करावी लागत आहे.

Buldhana ST, ST benefits , maharashtra Assembly elections ,
बुलढाणा : निवडणुकीमुळे एसटी महामंडळाचेही चांगभलं, तब्बल पाऊण कोटीचा…
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Information that 183 buses are closed every day in the state of Maharashtra
एसटी बसमध्ये वारंवार बिघाड… रोज १८३ बसच्या प्रवाश्यांना अडचण…
chhatrapati Sambhajinagar sports complex scam
१३ हजार पगार असलेल्या कर्मचाऱ्याने घातला २१ कोटींचा गंडा; प्रेयसीला दिला ४ बीएचकेचा फ्लॅट, स्वतः घेतल्या आलिशान गाड्या
st employees loksatta
एसटी कर्मचाऱ्यांच्या ऑनलाईन बदल्या, परिवहन मंत्र्यांच्या घोषणेवर संघटना म्हणते…
inspection of TMT drivers List of instructions for drivers thane news
टीएमटी चालकांची सकाळ संध्याकाळ तपासणी;  चालकांसाठी सुचनांची यादी
buldhana vidarbha
निर्यात क्षेत्रात ‘हा’ जिल्हा पश्चिम विदर्भात अव्वल; ४६५ कोटींची निर्यात
What is ‘flying naked’ (2)
Flying naked नवीन ट्रॅव्हल हॅक; तुम्ही हा ट्रेण्ड स्वीकारणार का?

हेही वाचा >>>Vijay Wadettiwar : “वाल्मिक कराडवर ३०२ चा गुन्हा दाखल करा, कारण संतोष देशमुख यांच्या हत्येचे धागेदोरे..”; काँग्रेसची मागणी

रेल्वेतर्फे अपंग, ज्येष्ठ नागरिक, तसेच कर्करोग पीडित व्यक्तींसाठी सवलत दिली जाते. ‘एसी टू’, ‘एसी थ्री’ श्रेणीतील तिकिटांवर ५० टक्के सवलत आहे. शयनयान श्रेणीत ७० टक्के सवलत आहे. तसेच, अपंग व्यक्तींसाठी काही जागा राखीव असतात. त्यांना प्राधान्याने खालचे आसन (लोव्हर बर्थ) दिले जातात. पण, या सुविधांचा लाभ केवळ तिकीट खिडकीवरून तिकीट खरेदी केल्यासच मिळतो. ऑनलाईन तिकीट बुकिंग करणाऱ्यांना हा लाभ मिळत नाही. त्यामुळे अपंग, अंध व्यक्तींना ऑनलाईन तिकीट बुकिंगची सुविधा तत्काळ उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी भारतीय यात्री केंद्राचे अध्यक्ष बसंतकुमार शुक्ला यांनी केली आहे.

हेही वाचा >>>Delhi Assembly Election 2025 : Delhi Assembly तिकीट वाटप ते प्रचार, दिल्ली विधानसभेसाठी मायावतींच्या पक्षाने आखली मोठी रणनीति

यासंदर्भात आयआरसीटीसीचे क्षेत्र व्यवस्थापक व्हीनस राऊत यांच्याशी संपर्क साधला असता प्रतिसाद मिळाला नाही. मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्निल निला यांनी याबाबत आयआरसीटीसीला कळवण्यात येणार असल्याचे सांगितले.

अपंग, अंध, ज्येष्ठ नागरिकांना ऑनलाईन रेल्वे तिकीट खरेदीची सुविधा उपलब्ध करण्याची आणि त्यांना सर्व सवलतीचा लाभ देण्याची सूचना संबंधित विभागाला केली जाईल. –दिलीप सिंह, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे

Story img Loader