नागपूर : अयोध्येत प्रभू रामचंद्रांची प्रतिष्ठानपना होणार असल्याने सोमवारी नागपूरकरही रामाच्या भक्तीत लिन झाले. शहरातील विविध भागांत मंदिर, रस्ते, चौक, अपार्टमेंट, निवासस्थानांवर भगवे ध्वज, तोरण, झेंडे, रस्त्यांवर रांगोळ्या सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होते. सर्वत्र मिरवणुकांमध्ये जय श्रीरामाचा गजर एकू येत होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अयोध्येतील राममंदिरात होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी सोमवारी अवघे नागपूर भगवा झेंडे, तोरण, रांगोळ्या, दिवे, रोषणाईने सजले आहे. शहरातील सर्व मंदिरांची स्वच्छता आणि सुशोभीकरण केले गेले. प्रतिष्ठापना दिनी सकाळपासून शहरात राम भक्तांनी मिरवणूक काढत जय श्रीरामचा गजर केला. सर्वत्र म्युझिक सिस्टम, डिजेवर रामावरील भक्तिगीते वाजत होती. शहरातील प्राचिन पोद्दारेश्वर राम मंदिर, रामनगर राम मंदिरात भाविकांनी पहाटेपासूनच दर्शनासाठी प्रचंड गर्दी केली.

हेही वाचा – फडणवीस म्हणाले, “मी आज कोणाविरुद्धही बोलणार नाही”

शहरातील अनेक भागात सुंदरकांड, हनुमान चालिसा पठण आदी धार्मिक कार्यक्रम सुरू आहे. टिळक पुतळा येथील राम मंदिर, स्वावलंबी नगर येथील राम मंदिर, रामनगरातील राम मंदिरासह साईमंदिर, टेकडी गणेश मंदिर, स्वामी समर्थ मंदिर, बालाजी मंदिर येथे विविध धार्मिक कार्यक्रम होत आहे. अयोध्येतील प्रतिष्ठापना सोहळा पाहण्यासाठी विविध मंदिरात थेट प्रक्षेपणाची व्यवस्था असून सर्वत्र भाविकांची गर्दी आहे. शहरातील विविध भागातील चौक सजवले असून आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. लक्ष्मीनगर, प्रतापनगर, बडकस चौक, इतवारी, धंतोली, गोकुळपेठ, धरमपेठ, वर्धमाननगर आदी चौकात रामायणातील विविध प्रसंगांवर देखावे तयार करण्यात आले आहेत. मंदिरात आणि इतर ठिकाणी रोषणाई, फुलांची सजावट, अन्नदान, भजन, कीर्तन आणि दीपोत्सवांचा कार्यक्रमही होत आहे. शहरातील विविध भागांत व मंदिर परिसरात भगव्या रंगाचे व केळीच्या पानाचे प्रवेशद्वार उभारण्यात आले आहे. घरोघरीही पूजाअर्चना आणि दीपोत्सव साजरा होत आहे.

हेही वाचा – वर्धा : सनदी अधिकारी सांगतात यशप्राप्तीचा मंत्र; म्हणतात, “केल्याने होत आहे रे…”

लाडू, पोहेसह विविध प्रसादांचे वाटप

उपराजधानीत पहाटेपासून राम भक्तांनी जय श्रीरामचा गजर करत सिव्हिल लाईन्समधील वाॅकर स्ट्रिज जवळ पोहे वाटप तर कुठे मिठाई तर कुठे लाडू व इतरही वस्तूंचे वाटप केले. मिरवणुकीत वाॅकर स्ट्रिटला भाविकांकडून श्री रामाचा दुपट्टा नागरिकांना भेट दिला. शहरातील विविध भागात कुठे सायकल, कुठे बाईक तर कुठे इतरही रॅली काढून जय श्री रामाचा गरज केला जात होता. शहरातील अनेक व्यापारी प्रतिष्ठानांवरही भगवे झेंडे व तोरणे लावून प्रसादाचे वाटप केले जात होते.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Procession in nagpur and distribution of prasad to the citizens on the occasion of ram temple inauguration in ayodhya mnb 82 ssb