वर्धा : आयुष्यभर आपल्या लेखनीतून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांचा प्रसार करणाऱ्या व राष्ट्रसंत तुकडोजी विचार प्रतिष्ठानचे संचालक असलेल्या रघुनाथ दादांचा मरणोत्तर देहसुद्धा त्यांचे अंतिम इच्छेनुसार ज्ञानदानासाठी दान करण्यात आला.

प्रा. रघुनाथ कडवे यांचा काटोल तालुक्यातील धर्तीमूर्ती या छोट्या खेड्यात जन्म झाला. जन्मानंतर नऊ महिन्यांच्या अंतराने त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला. अत्यंत गरिबीत मोलमजुरी करून आईने त्यांचे पालन-पोषण केले. याच काळात त्यांचा एक डोळा अधू झाला. उच्चशिक्षण घेऊन त्यांना शास्त्रज्ञ व्हायचे होते. पण, त्यांचे ते स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही.

FTII student short film, FTII student short film Oscar,
‘एफटीआयआय’च्या विद्यार्थ्याचा लघुपट ऑस्करच्या स्पर्धेत
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
Pune air, bad air, Pune air at hazardous levels
पुण्याची हवा धोकादायक पातळीवर, बिघडलेल्या हवेचे परिणाम काय?
Solutions to achieve educational goals by inculcating interest in learning
सांदीत सापडलेले…!: उपाय
loksatta editorial on india china relations
अग्रलेख : मुहूर्ताची मँडरिन मिठाई!
awareness campaign by fire brigade during diwali
दिवाळीत अग्निशमन दलाकडून जनजागृती मोहिम; सुरक्षित दिवाळी साजरी करण्याचे आवाहन
Dombivli Phadke Road Diwali, Phadke Road,
डोंबिवलीतील फडके रोडवर तरुणाईचा जल्लोष, विद्युत रोषणाईने फडके रोड झळाळला
shrimant dagdusheth ganpati temple, Phuket, Thailand
थायलंडमध्ये प्रति ‘दगडूशेठ’ गणपती मंदिर, फुकेतमध्ये ‘लॉर्ड श्रीमंत गणपती बाप्पा देवालय’ लवकरच खुले

हेही वाचा – आता दुरान्तोमध्ये तिकीट भाड्यात ‘बेडरोल’

हेही वाचा – “एमआयएम ही भाजपाचीच ‘बी टीम’”; चंद्रकांत खैरेंचे बावनकुळेंना प्रत्युत्तर; म्हणाले, “सध्या मुस्लीम आणि वंचित..”

शिष्यवृतीच्या मदतीवर शिक्षण घेऊन कृषी रसायनशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. श्रीगुरुदेव सेवा मंडळाचे मुखपत्र ‘श्रीगुरुदेव’ मासिकाच्या संपादकपदाची जबाबदारी व युगग्रंथाचाही हिंदी व इंग्रजी भाषेत अनुवाद केला. राष्ट्रसंत समग्र गद्य वाङ्मयाचे संपादनही केले. लेखन, संपादन व अनुवादाची त्यांची ११५ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. निवृत्ती वेतनातून मिळालेला पैसा राष्ट्रसंताच्या साहित्य निर्मितीसाठी वापरला. नागपूर विद्यापीठातील राष्ट्रसंत अध्यासन मंडळ अभ्यासक्रम समितीचे ते सदस्य होते. महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार, जनसाहित्य पुरस्कारासह अनेक पुरस्कारांचे धनी असलेल्या प्रा. कडवे यांचे नाव अमेरिकेतील करोलिना येथून प्रकाशित होणाऱ्या विश्वचरित्र कोशात समाविष्ट झाले आहे.
प्रा. रघुनाथ कडवे यांच्या दुखःद निधनाने गुरुदेव परिवाराने जेष्ठ साहित्यिक, संशोधक, संकलक गमावला आहे. त्यांनी मरणानंतरचे सोपस्कार न ठेवता नागपूरच्या शासकीय रुगणालयाला देहदान केले.