बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण महाराज यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे आव्हान स्वीकारले, पण नागपुरात येणार नाही, त्यासाठी तुम्हाला रायपूरला यावे लागले, अशी अट घातली. त्यावर प्रा. श्याम मानव यांनी भक्तांच्या आड कशाला लपता, धमक असेल तर नागपुरात या धीरेंद्र महाराज यांना आव्हान दिले. अखिल भारत अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापक व राष्ट्रीय संघटक प्रा. श्याम मानव महाराज यांच्या अतिबाबत म्हणाले, रायपूरला बोलवून भक्तांच्या आड कशाला लपता, धमक असेल तर नागपुरात येऊन तुमची शक्ती सिद्ध करा. नागपूर येथे ते बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- धीरेंद्र कृष्ण महाराजांची कमाई आयटी कंपनीतल्या अधिकाऱ्यापेक्षा जास्त! एक कथा सांगण्यासाठी घेतात ‘इतके’ रुपये

प्राध्यापक श्याम मानव यांनी बागेश्वर महाराज उर्फ धीरेंद्र महाराजांना त्यांच्यातील दिव्यशक्ती सिद्ध करण्याचं ३० लाख रुपयांचे बक्षीस आव्हान दिले होते. यानंतर धीरेंद्र महाराजांनी त्यांच्या रायपूर येथील दरबारात आव्हान स्वीकारले. पण त्यासाठी रायपूरला दरबारात या, आपण नागपूरला येणार नाही, असे सांगितले. यावर श्याम मानव यांनी प्रतिक्रिया दिली असून ‘तुमच्याकडे दिव्यशक्ती असेल तर तुम्ही नागपूरला या, रायपूरला बोलवून भक्तांच्या आड कशाला लपता, धमक असेल तर नागपुरात येऊन तुमची शक्ती सिद्ध करा’ असे आव्हान बागेश्वर महाराज यांना प्रा. श्याम मानव यांनी दिले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Professor manav challenges dhirendra krishna maharaj again to come to nagpur if you dare rbt 74 dpj