नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विविध विभागांसह दोन महाविद्यालयांतील प्राध्यापकांच्या ९२ पदांच्या भरतीसाठी विद्यापीठाद्वारे जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. मात्र, एकीकडे विद्यापीठाचे कुलगुरू आर्थिक घोळामुळे चौकशीच्या फेऱ्यात असताना, त्यांनी इतक्या घाईने कशी काय पदभरतीची जाहिरात काढली? असा प्रश्न सिनेट सदस्य ॲड. मनमोहन वाजपेयी यांनी उपस्थित केला आहे. याबाबत राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्र्यांना निवेदन सादर करीत त्यांना पदभरतीपासून दूर ठेवावे अशी मागणी केली आहे.
हेही वाचा – नागपूर : एकतर्फी प्रेमातून मैत्रिणीला शारीरिक संबंधाची मागणी
हेही वाचा – अजित पवार काकांना वारंवार का भेटतात? वडेट्टीवार यांनी सांगितले कारण
मात्र ही जाहिरात येताच शैक्षणिक वर्तुळात बंटी – बबलीच्या जोडीची चर्चा रंगली आहे. ॲड. मनमोहन वाजपेयी यांनी आरोप केला आहे की काही संधीसाधू व्यक्ती जे विद्यापीठाचे कोणत्याही पदावर आरूढ नाहीत, अशांचा विद्यापीठात वावर वाढलेला आहे. नागपूर शहरात काही वर्षांआधी बंटी बबली या नावाने फसवणुकीचे एक प्रकरण समोर आले होते. त्याच धर्तीवर पुन्हा उमेदवारांची फसवणूक होवू शकते, अशी चर्चा विद्यापीठ वर्तुळात जोरात सुरू झाली आहे.