बुलढाणा : राज्यात प्रतिबंधित असलेल्या गुटख्यांचा शेजारील मध्यप्रदेशमधून बुलढाणा जिल्ह्यात पुरवठा होत असल्याचे वृत्त आहे. मलकापूर पोलिसांनी केलेल्या मोठ्या कारवाईने ही बाब सामोरे आली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मध्य प्रदेशातील बऱ्हानपूर येथून जिल्ह्यातील नांदुरा येथे गुटखा विक्रीसाठी आणल्या जात असल्याची माहिती मलकापूर शहर पोलिसांना मिळाली. या माहितीवरून पोलिसांनी पाठलाग करून बोलेरो वाहनाची तपासणी केली. वाहनात गुटख्याचा साठा आढळून आला. त्यावरून पोलिसांनी बऱ्हानपूर येथील तीन आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली. सोबतच गुटखा आणि वाहन असा १८ लाख ८१ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

हेही वाचा – सरकारी कार्यालयात प्रीपेड वीज मीटर; केंद्र सरकारचे सुतोवाच

हेही वाचा – बुलढाणा : रेशन धान्याच्या काळ्या बाजाराचे राजस्थान कनेक्शन? मलकापुरात २०० पोते तांदूळ जप्त

दरम्यान गुटखा वाहतूक व विक्री मध्ये अजून कोणी सहभागी आहे का? याचा पोलीस तपास करत आहेत. त्यामुळे आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prohibited gutkha is being supplied to buldhana from madhya pradesh 19 lakh worth of goods seized in border malkapur scm 61 ssb