नागपूर : मेट्रो प्रकल्प टप्पा-१ ला गती देण्यासाठी वाढीव ५९९ कोटींच्या खर्चास राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी मंजुरी दिली. त्यामुळे या प्रकल्पाची शिल्लक कामे लवकर होण्याची शक्यता आहे. मेट्रोचा मूळ प्रकल्प ८६८० कोटींचा असून त्यात ५९९ कोटींची वाढ झाल्याने सुधारित ९२७९ कोटींच्या सुधारित खर्चाचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवण्यात आला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्याला मंजुरी देण्यात आली. टप्पा १- मध्ये ऑटोमोटिव्ह चौक ते मिहान मार्गिका क्र.१ व प्रजापतीनगर ते लोकमान्यनगर ही मार्गिका क्र.२ अशा एकूण ३८.२१५ कि.मी. लांबीच्या दोन मार्गिकांचा व ३८ स्थानकांचा समावेश आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या प्रकल्पास सन २०१४ मध्ये मंजुरी देण्यात आली होती. प्रकल्पाचा मूळ नियोजित बांधकाम कालावधी एप्रिल, २०१३ ते एप्रिल, २०१८ असा ५ वर्षांचा होता. प्रत्यक्षात जून, २०१५ मध्ये कामास सुरुवात झाली. या प्रकल्पाच्या एकूण ३८.२१५ कि.मी. लांबीपैकी २६ कि.मी. वर सध्या मेट्रो धावत आहे. प्रकल्पाची उर्वरित १२ कि.मी. मार्गिका लवकरच कार्यान्वित होणार आहे. प्रकल्पाच्या बांधकामास झालेला विलंब, प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या जमिनीच्या क्षेत्रात तसेच किंमतीत झालेली वाढ, दोन अतिरिक्त मेट्रो स्थानकांच्या उभारणीसह अन्य कारणांमुळे प्रकल्प किंमतीमध्ये वाढ झाली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Project of nagpur metro speed up approve 599 crore expenditure nagpur tmb 01