चंद्रपूर : कोरपना तालुक्यातील उपरवाही येथील अंबुजा सिमेंट कंपनीच्या विस्तारीत प्रकल्पासाठी गुरुवारी जिल्हा प्रशासन व प्रदूषण मंडळाने जनसुनावणी घेतली. यात १२ गावांतील प्रकल्पग्रस्तांनी ‘अंबुजा गो-बॅक, अदानी गो-बॅक’चे नारे देत सिमेंट कंपनीविरोधात घोषणाबाजी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जिल्हा प्रशासन व प्रदूषण नियंत्रण मंडळाने राजुरा तालुक्यातील भेंडवी गावात जनसुनावनी आयोजित केली होती. या जनसुनावणीमध्ये १२ गावांतील प्रकल्पग्रस्तांनी विरोध नोंदवला. प्रशासनाने अंबुजा कंपनीची दलाली बंद करावी आणि कंपनीचा भूसंपादन करार रद्द करण्याची प्रलंबित कारवाई तातडीने पूर्ण करावी, अशा मागण्या यावेळी प्रकल्पग्रस्तांनी केल्या.

हेही वाचा – गडचिरोली : सूरजागड लोहाखाणीत सुरू असलेले उत्खनन अवैध, केंद्र शासनाला नोटीस

यावेळी पप्पू देशमुख, आकाश लोडे, कमलेश मेश्राम, सचिन पिंपळशेंडे, निखिल भोजेकर, चंदू झाडे, संदीप वरारकर, विष्णू कुमरे, तुषार निखाडे, प्रवीण मटाले, संतोष निखाडे, संजय मोरे, भोजी शिडाम तसेच जनविकास सेनेचे राहुल दडमल, अक्षय येरगुडे प्रामुख्याने उपस्थित होते.

अंबुजा सिमेंट कंपनी म्हणजेच पूर्वीची मराठा सिमेंट कंपनी सुरू करताना बारा गावांतील ५२० प्रकल्पग्रस्तांची सुमारे १२५० हेक्टर जमीन अधिग्रहित करण्यात आली होती. प्रकल्पबाधित १२ गावांतील शेकडो प्रकल्पग्रस्तांनी नोकरीच्या मागणीसाठी आंदोलन सुरू केले.

जनसुनावणीचे औचित्य काय?

१४ जुलै २०२२ ला जिल्हा प्रशासनाने शासनाला सविस्तर सद्यस्थिती अहवाल पाठवून कंपनीने भूसंपादन करार रद्द केल्याचा पुनरुच्चार केला व शासनाकडे कारवाई प्रस्तावित केली. मात्र, यावर कोणतीही कारवाई झाली नाही. अंबुजा सिमेंट कंपनीचा पूर्वीचा भूसंपादन करार रद्द करण्याची कारवाई अंतिम टप्प्यात असताना विस्तारित प्रकल्पाकरिता जनसुनावणी घेणे अनुचित असल्याचा आरोप पप्पू देशमुख यांनी यावेळी केला.

हेही वाचा – उपराजधानीत जीर्ण इमारतींच्या सर्वेक्षणाकडे अक्षम्य दुर्लक्ष; दहा दिवसांत भिंत, घर पडून तिघांचे मृत्यू

मंडप पडून ६ जण जखमी

जनसुनावणी सुरू असताना अचानक मुसळधार पाऊस व सुसाट वेगाने वादळ वाऱ्यामुळे मंडप कोसळला. यात सहाजण जखमी झाले. जखमींमध्ये प्रतीभा संतोष आत्राम (३१) सरपंच उपरवाही, प्रेमाला जोगेराम येडमे (४५) गेरेगुडा (भेंडवी), रामू भिमराव पुसान (७०) भेंडवी, साईकीरा भीमराव येलार (१७) भेंडवी यांच्यासह अन्य दोनजणांचा समावेश आहे .

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Project victims raised slogans against the cement company in a public hearing at bhendvi village in rajura taluka rsj 74 ssb
Show comments