लोकसत्ता टीम

चंद्रपूर : बियर शॉपी परवान्यासाठी एक लाखाची लाच स्वीकारणारे दुय्यम निरीक्षक चेतन खारोडे व कार्यालय अधीक्षक अभय खताळ यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याने उत्पादन शुल्क विभागात खळबळ उडाली आहे.

Murlidhar Mohol allegations, Sharad Pawar,
केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचा शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप; म्हणाले, चारवेळा..!
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट…
election
आमगावात विद्यमान आमदाराचे तिकीट कापले; अर्जुनी मोरगावमध्ये माजी आमदाराला संधी
Sassoon Hospital exceeds capacity facing burden of forensic cases steps are being taken to reduce it
‘ससून’वरील ताण कमी होणार! अतिरिक्त पोलीस आयुक्तांचे वानवडी, हडपसर पोलिसांना आदेश
Mumbai officials ordered strict action against illegal activities ahead of assembly elections
निवडणूक काळात तातडीच्या जप्तीचे आयुक्तांचे आदेश
rajan vichare challenged shiv sena mp naresh mhaske in bombay high court
नरेश म्हस्के यांच्या खासदारकीला आव्हान; जप्त मतदान यंत्र पुन्हा निवडणूक आयोगाकडे
law and order in maharashtra ahead of assembly
‘योजने’चे पैसे मिळाले; पण कायदासुव्यवस्थेचे काय?
RSP chief Mahadev Jankar slams Mahayuti and BJP
RSP chief Mahadev Jankar: पंतप्रधान मोदींनी ज्यांचा प्रचार केला, त्या महादेव जानकरांचा महायुतीवर गंभीर आरोप; म्हणाले, “वापरा अन् फेका…”

तर उत्पादन शुल्क अधीक्षक संजय पाटील यांच्या निलंबनाचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. विशेष म्हणजे सोमवारी जिल्हा व सत्र न्यायालयाने खरोडे व खताळ यांना जामीन मंजूर केला तर पाटील यांचा अटकपूर्व जामीन नामंजूर केला आहे.

आणखी वाचा-नागपूरः गुन्हेगारी कारवायांमध्ये सहभाग; एक हवालदार बडतर्फ, दोन पोलीस निलंबित

घुग्घुस येथील गोदावरी बियर बार व रेस्टारंटचे संचालकांनी बियर शॉपी परवान्यासाठी दुय्यम निरीक्षक चेतन खारोडे, कार्यालय अधीक्षक अभय खताळ यांनी उत्पादन शुल्क अधीक्षक यांच्या निर्देशानुसार एक लाख रूपयांची लाच मागितल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उपअधिक्षक मंजुषा भोसले यांच्याकडे दाखल केली होती. या तक्रारीच्या आधारावर मंगळवार ७ मे रोजी सापळा रचून खारोडे व खताळ या दोघांना एक लाखाची लाच स्वीकारतांना अटक केली होती.

आणखी वाचा-नागपूर : ध्वनिप्रदूषण करणाऱ्या बुलेटधारकांविरुद्ध मोहीम, मॅकेनिकवरही पोलीस कारवाई

त्यानंतर प्रतिबंधक विभागाने या दोघांना न्यायालयात हजर करून पोलिस कोठडीची मागणी केली होती. न्यायालयाने दोघांची १० मे पर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली. दोन्ही अधिकारी ४८ तासापेक्षा अधिक काळ पोलिस कोठडीत राहिल्याने व त्यानंतर पुन्हा तीन दिवस कारागृहात राहिल्याने उत्पादन शुल्क विभागाने खारोडे व खताळ या दोघांवर निलंबनाची कारवाई केली आहे. तसेच ७ मे पासून फरार असलेले उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संजय पाटील यांच्या निलंबनाचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. या प्रकरणात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी एसआयटी चौकशीची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे तर आमदार सुधाकर अडबाले यांनीही तिन्ही अधिकाऱ्यांच्या संपत्तीची चौकशी करावी अशी मागणी गृह मंत्री यांच्याकडे केली आहे.