लोकसत्ता टीम

नागपूर : शहरात ऑनलाईन पद्धतीने सुरु असलेल्या ओयो हॉटेल यश-२४ येथील देहव्यापाराच्या अड्ड्यावर पोलिसांनी छापा घातला. छाप्यात दिल्ली, पश्चिम बंगाल आणि दिल्लीतील ५ तरुणींना देहव्यापार करताना ताब्यात घेण्यात आले तर देहव्यापाराचे सूत्रधार पाच जणांना अटक केली. ही कारवाई बुधवारी दुपारी करण्यात आली.

Mehkars Circuit youth detained for providing false information about emergency alert system
‘मंदिरावर हल्ला झाला’! ‘त्या’ क्रमांकावर संदेश आल्याने पोलिसांची धावपळ, प्रत्यक्षात…
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
police action on massage parlour misbehavior is going on in name of massage parlour
मसाज पार्लरच्या नावाखाली गैरप्रकारांवर कारवाईचा बडगा, वर्षभरात पोलिसांकडून ३३ गुन्हे दाखल
Woman police officer abused for not taking action on vehicle
पिंपरी : कारवाई करू नये म्हणून महिला पोलिसाला शिवीगाळ
Dismissed police officer killed woman with scarf over immoral relationship
नागपूर : अनैतिक संबंध! बडतर्फ पोलीस कर्मचाऱ्याने प्रेयसीचा गळा आवळला, मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी…
Food stalls from IT Park to Mate Chowk have found new ways to avoid legal action
पदावरील खाद्यापदार्थ विक्रेत्यांची अशीही चलाखी उघड; पोलीस, महापालिकेनेच दाखवली पळवाट?
mla mahesh landge claim bangladeshi and rohingyas working in scrap warehouses
पिंपरी- चिंचवड: अनधिकृत भंगार गोदामात बांगलादेशी घुसखोर आणि रोहिंगे; आमदार महेश लांडगे
Four lakhs cash was stolen, hotel, Kalyaninagar area,
कल्याणीनगर भागातील हॉटेलमधून चार लाखांची रोकड चोरीला

बालाजीनगर-बंशीनगर मेट्रो स्टेशनजवळ हिंगना मार्गावर ओयो होटल यश-२४ नावाचे हॉटेल आहे. गेल्या अनेक दिवसांपासून तेथे दिल्ली, मुंबई, काश्मीरसह अन्य राज्यातील तरुणींना देहव्यापार करण्यासाठी बोलावण्यात येत होते. गुन्हे शाखेच्या कविता इसारकर यांना माहिती मिळताच त्यांना बुधवारी छापा घातला. पाच तरुणींना देहव्यापार करताना ताब्यात घेतले. तर दलाल यश दीपकराव बलोदे , शुभम बळवंत मालखेडे रा. चांदुरबाजार, अमरावती, संकेत विष्णू तितरमारे, मनोज अरूण खंडाळे आणि सागर मधूकर बिजवे रा. अचलपूर, अमरावती यांना अटक केली.

आणखी वाचा-मेडिकलचे अधिष्ठाता डॉ.राज गजभिये यांच्यासह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा; प्रकरण काय? जाणून घ्या…

अन्य राज्यातील तरुणींची मागणी

नागपुरात आंबटशौकीन ग्राहकांसाठी काश्मीर, उत्तरप्रदेश, पश्चिम बंगाल, दिल्ली आणि पंजाबमधील तरुणींना करारतत्वावर बोलावण्यात येत होते. दलाल राहुल आणि मनोज अग्रवाल ऊर्फ गगन ठाकूर हे अन्य राज्यातील तरुणींशी संपर्क साधून त्यांची नागपुरात राहण्याची व्यवस्था करीत होते. रजत, रोशन, नीलेश आणि प्रिंस हे राजकीय क्षेत्रातील आणि व्यापारी क्षेत्रातील श्रीमंत ग्राहक शोधून हॉटेलमध्ये पाठवत होते. त्यामुळे ऑनलाईन देहव्यापार करणारी मोठी टोळी नागपुरात सक्रीय असल्याची माहिती समोर आली.

आणखी वाचा-पहिल्या दोन टप्प्यातच निवडणुका आटोपल्याने ‘या’ व्यवसायावर मंदी

छाप्यातील तरुणी उच्चशिक्षित

देहव्यापार करताना सापडलेल्या तरुणी उच्चशिक्षित असून त्यांचे इंग्रजीवर प्रभूत्व आहे. आपला स्वत:चा खर्च भागविण्यासाठी त्या देहव्यापाराच्या दलदलीत उतरल्या आहेत. झटपट पैसा कमावून मित्रांसोबत दारु पार्टी, पब, विमान प्रवास, आवडते ड्रेस, महागड्या हॉटेलमध्ये राहणे किंवा शॉपींग करण्यासाठी पैसा तरुणी कमावत होत्या, अशी माहिती समोर आली आहे.

Story img Loader