नागपूर : ‘एमपीएससी’चा नवीन अभ्यासक्रम २०२५ पासून लागू करा, या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवारी आंदोलन केले. आंदोलनाचे नेतृत्व एनएसयूआय आणि स्टुडंट राईट असोसिएशनने केले. यावेळी आमदार अभिजित वंजारी उपस्थित होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एमपीएससीने नवीन वर्षात म्हणजेच २०२३ मध्ये संपूर्ण अभ्यासक्रम बदलून नवीन अभ्यासक्रम लागू केला आहे. अचानक अभ्यासक्रम बदलल्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी वेळ मिळणार नाही आणि कित्येक वर्षांची मेहनत वाया जाईल. त्यामुळे हा अभ्यासक्रम २०२५ पासून लागू करण्यात यावा, अशी मागणी करत विद्यार्थी रस्त्यावर उतरले. ‘एमपीएससी’च्या परीक्षांमध्ये गेल्या कित्येक वर्षांपासून घोटाळे होत असल्याने त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसत आहे. यामुळे आंदोलन करून लक्ष वेधण्याचा प्रयत्न विद्यार्थी करत आहेत. परंतु शासनाकडून दखल घेतली जात नाही. आयोगाने अभ्यासक्रम २०२५ पासून लागू करण्यास नकार दिला. नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनामध्येही हा विषय चर्चेला आला होता. मात्र, आयोग २०२३ पासूनच अभ्यासक्रम लागू करण्यावर ठाम आहे. यामुळे विद्यार्थ्यांनी आंदोलन पुकारले.

हेही वाचा >>> अबब! झाडे कोट्यधीश तर गाणार लक्षाधीश…

पोलीस-पदाधिकाऱ्यांमध्ये तणाव

राज्यातील इतर महत्त्वाच्या शहराप्रमाणे नागपुरातही तीव्र आंदोलन झाले. यावेळी आंदोलकांनी आयोगाच्या व सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. यावेळी एनएसयूआयच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन केल्याने पोलीस आणि पदाधिकाऱ्यांमध्ये तणाव निर्माण झाला होता. आंदोलनाला एनएसयूआचे अध्यक्ष अनिरुद्ध पांडे, स्टुडंट राईट्सचे उमेश कोर्राम आदी उपस्थित होते.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Protest against stance of mpsc demand implementation new syllabus from 2025 onwards dag 78 ysh