यवतमाळ : जिल्हा परिषदेअंतर्गत कार्यरत प्राथमिक शिक्षकांच्या मुख्याध्यापक पदोन्नतीसह इतर मागण्या प्रलंबित आहेत. याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने आज मंगळवारी जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन केले.जिल्हा परिषदेत गेल्या काही वर्षांपासून शिक्षण विभागाची कामे अतिशय वेळकाढू धोरणानुसार संथगतीने हाताळली जात आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शिक्षकांच्या समस्येसाठी सर्व संघटना सातत्याने निवेदन देत आहेत. मात्र, त्यावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही होत नाही. मुख्याध्यापक पदोन्नती व विषय शिक्षक पदोन्नती नियमितपणे करणे गरजेचे असतानाही नियमित केली जात नाही. त्यामुळे शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. अनेक शाळांवर पुरेसे शिक्षक उपलब्ध नाहीत. नवीन शिक्षक भरतीत अडथळा येत आहे. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर होत आहे. जिल्हा शैक्षणिक क्रमवारीत माघारला जात आहे. मुख्याध्यापक पदोन्नती व विषय शिक्षक पदोन्नती लवकरात लवकर करावी, एकाच पदावर २४ वर्षे सेवा पूर्ण करणार्‍या शिक्षकास निवडश्रेणी लागू करावी, शिक्षकांची वैद्यकीय बिले, भविष्यनिर्वाह निधी प्रस्ताव यासारख्या कामांसाठी चार ते पाच महिन्यांचा विलंब केला जातो, याकडेही लक्ष वेधण्यात आले.

हेही वाचा >>>सत्ताधारी पक्षाचेच आमदार शासनाविरोधात आंदोलन करणार, कारण काय वाचा…

हेही वाचा >>>नागपूर: महापालिका शिक्षक भरतीत पात्रतेच्या निकषाचा घोळ; जाणून घ्या काय आहे प्रकरण?

विविध मागण्यांचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना देण्यात आले. धरणे आंदोलनात जिल्हाध्यक्ष किरण राठोड, जिल्हा सरचिटणीस सारंग भटूरकर, प्रदीप खंडाळकर, रवींद्र कचरे, शुभांगी ढाले, नीलेश ठाकरे यांच्यासह जिल्हाभरातील शिक्षक उपस्थित होते.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Protest for promotion of principal in yavatmal nrp 78 amy