वर्धा : नाना कारणांनी येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ नेहमीच चर्चेत असते. वादाचे दुसरे नाव म्हणजे हिंदी विद्यापीठ, असे म्हटल्या जाते. सध्या विधी अभ्यासक्रमाचा वाद सुरू आहे.
हेही वाचा – नागपुरात करोनाग्रस्त वाढले, ६ जण रुग्णालयात, किती सक्रिय रुग्ण पहा..
येथील एलएलबी अभ्यासक्रमाला बार कौन्सिल ऑफ इंडियाची मान्यता नसल्याने दीड महिना शिकविणे बंद होते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सतत दबाव आणला. अखेर विद्यापीठाने मान्यता मिळवून घेतली. मात्र नियमित वर्ग सुरू झालेले नाहीत. शैक्षणिक नुकसान होत असल्याने विद्यार्थ्यांनी कुलसचिवांच्या दालनात ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. या मागणीसोबतच पूर्वी ज्या विद्यार्थ्यांचे निलंबन केले ते रद्द करण्याची मागणी आहे. आंदोलनाबाबत अद्याप काहीही तोडगा न निघाल्याने आंदोलन सुरूच असल्याची माहिती मिळाली.