नागपूर: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल अपमानास्पद व चुकीचे वक्तव्य केल्याबद्दल मंगळवारी  काँग्रेस नेते गिरीश पांडव यांच्या नेतृत्वाखाल मानेवाडा चौकात निषेध मोर्चा काढण्यात आला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजप प्रवक्ते सुधाशू यांचा मोर्चात निषेध करण्यात आला, एवढेच नव्हे तर त्यांच्या बाबत शिवराळ भाषेचा वापर करण्यात आला. गिरीश पांडव यांनी राज्यपाल हे भाजपचे दलाल असल्याची टीका केली. छत्रपती शिवरायांचा अपमान करणारे सुधाशू त्रिवेदी  कोण आहेत? असा सवाल केला. मोर्चात नागपूर शहर काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा