नागपूर : राज्यातील मराठी बेरोजगार युवक-युवतींना न्याय द्यायचा असेल तर आंध्र प्रदेशच्या धर्तीवर कायदे करा, अशी मागणी करत विधान भवनाच्या पायरीवर राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेस पक्षाच्या आमदारांनी आंदोलन केले. त्यासाठी न्याय द्या, न्याय द्या, बेरोजगारांना न्याय द्या..! अशा घोषणा देऊन सरकारचे लक्ष वेधण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आंदोलन करणाऱ्यांमध्ये आमदार निलेश लंके, सुनील टिंगरे, हिरामण खोसकर, नितीन पवार उपस्थित होते. याप्रसंगी स्थानिक भूमिपुत्रांना/ बेरोजगारांना ८० टक्के नोकऱ्या दिल्याच पाहिजे, आंध्रप्रदेशप्रमाणे राज्यातही महाराष्ट्र स्थानिक उमेदवार रोजगार उद्योग/ कारखाने कायदा २०२३ करावा. राज्यातील बेरोजगारांना प्रतिमाह ५ हजार रुपये भत्ता देण्यासाठी बेरोजगार भत्ता कायदा २०२३ मंजुर करण्यात यावा इत्यादी मागण्या करण्यात आल्या.