बुलढाणा जिल्ह्यातील हजारो शेतकरी पीक विम्यापासून अजूनही वंचित आहेत. यामुळे शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आज संतप्त शेतकऱ्यांसह कृषी कार्यालयात ठिय्या मांडला.आज, गुरुवारी दुपारी करण्यात आलेल्या या अनपेक्षित आंदोलनामुळे कृषी व पीक विमा अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यावेळी आक्रमक झालेल्या तुपकरांनी कृषी अधीक्षक अधिकारी चंद्रकांत डाबरे यांना घेराव घालत, पीक विमा कधी देणार? असा जाब विचारला. या अगोदर ३१ मार्चची मुदत दिली होती, पण ती मुदत टळून गेल्याचे त्यांनी सांगितले. आमच्या संयमाचा अंत पाहू नका, असा दम त्यांनी भरला. पीक विमा अधिकाऱ्यांनाही त्यांनी धारेवर धरत तत्काळ कारवाईची मागणी केली. कार्यवाही सुरू होईस्तोवर कार्यालय सोडणार नाही, अशी तंबी त्यांना दिली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Protest of farmers with ravikant tupkar in agriculture office buldhana scm 61 amy
Show comments