नागपूर : एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन व भत्ते आणि थकबाकी मिळायला हवी. या मागणीसाठी आषाढी एकादशीला पंढरपुरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घेराव घातला जाईल, अशी घोषणा नागपुरात महाराष्ट्र एस.टी. वर्कर्स काँग्रेसकडून (इंटक) केली आहे.

प्रेस क्लबमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत इंटकचे राज्य सरचिटणीस मुकेश तिगोटे म्हणाले, १९९६ पूर्वी एसटी कर्मचाऱ्याला शासकीय कर्मचाऱ्यांहून जास्त वेतन होते. परंतु, आता शासकीय कर्मचाऱ्याच्या तुलनेत खूप कमी वेतन मिळते. या कर्मचाऱ्यांना न्याय देण्यासाठी कामगार करार पद्धत रद्द करून शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते करण्याची गरज आहे. त्यासाठी २९ जूनला पंढरपूरला आंदोलन केले जाईल.

हेही वाचा – नागपूर विद्यापीठाच्या नावावर बनावट पदव्या! चक्क २६ विद्यार्थ्यांनी मिळविली विदेशात नोकरी… वाचा काय आहे प्रकरण?

भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी शासनात विलीनीकरणाच्या नावावर कर्मचाऱ्यांच्या भावनांचा राजकारणासाठी वापर केला. त्यामुळे सेवाज्येष्ठ कर्मचाऱ्यांच्या वेतनात त्रुटी निर्माण झाली. तर दुसरीकडे ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनीही विविध अफवांचे प्रलोभन देऊन एसटी कर्मचाऱ्यांच्या भावनेशी खेळ केला. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांची पिळवणूक झाली, असे तिगोटे म्हणाले.

Story img Loader