चंद्रपूर : केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदिपसिंग पुरी यांचा ताफा खेमजई गावाकडे येत असताना सामाजिक कार्यकर्ते किशोर डुकरे व त्यांच्या आठ सहकाऱ्यांनी ताफ्याला अडवून जय जवान, जय किसानच्या घोषणा देत काळे झेंडे दाखवले. सरकारला शेतकऱ्यांची काळजी नाही. नैसर्गिक खते आणि औषधांचे दर वाढले आहेत. शेतकरी चिंतेत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> अजितदादांचा ‘न्यू लूक…’ शर्ट-पँट आणि गॉगल परिधान करून नागपुरात मेट्रो प्रवास

महागाईने जनता हैराण झाली आहे. मात्र, सरकार लक्ष देत नसून तुम्ही विकास भारत संकल्प यात्रा काढता, असे डुकरे म्हणाले. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन शेगाव पोलीस ठाण्यात नेले. यासंदर्भात डुकरे यांनी सकाळी समाज माध्यमावर केंद्रीय मंत्र्यांचा निषेध करणार असल्याची पोस्ट टाकल्याचे सांगण्यात येत आहे. ही माहिती मिळताच पोलीस प्रशासन सतर्क झाले होते. तेव्हापासून डुकरे यांचा शोध सुरू होता, मात्र ते पोलिसांना सापडले नाही. केंद्रीय मंत्र्यांचा ताफा असळा गावाजवळ येताच आदोलकांनी मंत्र्यांना काळे झेंडे दाखवून निषेध केला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Protesters detained by police for waving black flags to union petroleum minister rsj 74 zws
Show comments