नागपूर : मतदान प्रक्रिया निर्भय आणि पारदर्शक व्हावी म्हणून पोलीस प्रशासनाने सतर्कतेने कर्तव्य बजावणे अपेक्षित असते. परंतु उत्तर नागपुरातील नागसेन विद्यालयातील मतदान केंद्रात तैनात असलेले पोलीस उपनिरीक्षक संजय सोनवणे यांनी मतदारांशी अरेरावी केली. या अधिकाऱ्याने पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांनाही ओळखत नसल्याचे सांगून उद्दामपणाचा कळसच गाठला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – ‘मोदींची गॅरंटी’ म्हणजे क्षणाक्षणाची मेहनत! वर्ध्यात नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन

हेही वाचा – Lok Sabha Elections 2024 : पूर्व विदर्भात ५७.८२ टक्के मतदानाची नोंद

नागसेन विद्यालयातील केंद्रावर सहा वाजतानंतर काही मतदार आले होते. नियमानुसार त्यांना मतदान करता आले नाही. परंतु प्रवेशद्वाराच्या आत वेळेत प्रवेश करणाऱ्यांनाही मतदान करू दिले नाही, असा दोन महिलांचा आरोप होता. यावेळी काही माध्यम प्रतिनिधींनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून नेमका प्रकार समजून घेण्याचा प्रयत्न केला असता संजय सोनवणे यांनी माध्यम प्रतिनिधींना प्रवेशद्वारावच अडवले. प्रतिनिधींनी निवडणूक आयोगाचे ओळखपत्र दाखवले. परंतु सोनवणे म्हणाले, असे ओळखपत्र खूप बघितले, तुम्ही आत जाऊ शकत नाही. त्यानंतर सदर प्रतिनिधीने नागपूरचे पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांच्याशी सोनवणे यांच्या भ्रमणध्वनीवरून बोलणे करून दिले. त्यांचे आपसात सुमारे तीन-चार मिनिटे बोलणे झाले. तरी सोनवणे मी कोणाशी बोललो हे सदर प्रतिनिधीलाच विचारत होते. पोलीस आयुक्त सिंगल यांना ओळखत नाही, असे सांगत त्यांनी उद्दामपणाचा कळसच गाठला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Psi sanjay sonawane says i dont know the commissioner of police what exactly happened find out rbt 74 ssb