वर्धा: सेलू तालुक्यातील आकोली हेटी येथे शुक्रवारी सायंकाळी निर्घृण हत्या करण्यात आली. मामा सुधाकर जनार्दन लोहे यांच्याकडे राहणारा भाचा संघपाल विनोद भोंगाडे हा मनोरुग्ण आहे. तो कोणाच्याही अंगावर धावून जायचा.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

घटनेच्या दिवशी सायंकाळी मामा जेवणाच्या तयारीत लागला होता. त्यावेळी भाचा संघपाल हा स्वयंपाकघरात धावून आला. हातात खलबत्ता घेत त्याने मामाच्या डोक्यावर प्रहार केले. त्यात मामा जागीच ठार झाला. माहिती मिळताच सेलुचे ठाणेदार तिरुपती राणे हे चमुसह दाखल झाले. आरोपी संघपाल यास अटक करण्यात आली.

हेही वाचा… लोकसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीला वेग, केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव आज जिल्ह्यात; बुलढाणा मतदारसंघावर पुन्हा खलबते

ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह पाठविण्यात आला. वेडसर भाच्याच्या अविवेकी संतापात मामाचा बळी गेल्याबद्दल गावात हळहळ व्यक्त होत आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Psychopath nephew killed his uncle in rage at akoli wardha pmd 64 dvr