यवतमाळ : जिल्हा पोलीस दल व मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ‘नशामुक्त पहाट’अभियान राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात बुधवारी आर्णी, दिग्रस, कळंब, दारव्हा येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी नशेमुळे होणार्‍या दुष्परिणामावर पथनाट्यातून जनजाजृगती केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पहिल्या सत्रात चारही तालुक्यातील शाळा, महाविद्यालयात साडेतीन हजार विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. दुसर्‍या सत्रात पालक, पोलीस पाटील, शिक्षक व नागरिकांनी सहभाग घेतला. मुक्तांगणचे विजय देसाई, निहार हसबनीस,अमर देसाई, नीरज शेवाळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तरुण व्यसनाच्या विळख्यात अडकत आहेत. तणावातून मुक्त होण्यासह एकटेपणा दूर करण्यासाठी व्यसनाधीन होत आहे.

हेही वाचा >>> पहिल्या प्रेमामुळे विवाहित युवकाचा सुखी संसार अडचणीत; ‘भरोसा सेल’च्या मदतीने निघाला तडजोडीचा मार्ग

तंबाखू, गुटखा, धुम्रपान, मद्यपान या व्यसनाचा आपल्या शरीरावर काय परिणाम होतो. त्यापासून कसे दूर राहता येईल, याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. दिग्रस येथे रहदारीच्या ठिकाणी पथनाट्य सादर करण्यात आले. यावेळी शेकडो नागरिक उपस्थित होते. नशामुक्त अभियान पोलीस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड, अपर पोलीस अधीक्षक पीयूष जगताप, आदींच्या संकल्पनेतून राबविण्यात येत आहे.